Harshvardhan Patil : विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं अद्याप महायुतीची बैठक झाली नाही. पण लवकरच बैठक होणार आहे. अजित पवारांनी (Ajit Pawar) अन्याय केला का नाही? हे आपल्याला सगळ्यांना माहीत असल्याचे वक्तव्य भाजप नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी केलं. आता महायुती झाली आहे. अजूनही कोणत्याच प्रकारची जागा वाटप झाली नसल्याचे पाटील म्हणाले.


इंदापूरमध्ये महायुती म्हणून आम्ही लढण्याची तयारी केलीय


बैठकीनंतर लवकरच जागावाटपाच्या संदर्भात निर्णय होईल, त्यावेळी निर्णय होईल त्यावेळी बघू. पण इंदापूरच्या जागेचा निर्णय देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) घेतील असे अजित पवारांनी सांगितले आहे. महायुती म्हणून आम्ही लढण्याची तयारी केली असल्याचे हर्षवर्धन पाटील म्हणाले. तसेच बारामती लोकसभा मतदारसंघात पराभवाचे चिंतन देखील सुरु असल्याचे हर्षवर्धन पाटील म्हणाले. 


साखरेची MSP वाढवा, इथेनॉलचे दर वाढवा, अमित शाह यांच्याकडे मागणी


साखरेची MSP 4 हजार रुपये करावी अशी मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Minister Amit Shah) यांच्याकडे केल्याचे वक्तव्य भाजप नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी केली. अमित शाह यांच्यासोबत झालेल्या चर्चेत इथेनॉलच्या दारात वाढ करावी तसेच 30 लाख मॅट्रिक टन एवढी अतिरिक्त साखर आहे. त्यामुळं  साखर निर्यातीला परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आल्याचे हर्षवर्धन पाटील म्हणाले. 


राज्यातील 15 कारखान्याला मदत मिळावी अशी मागणी 


उद्या बोर्ड मिटिंगमध्ये राज्यातील 15 कारखान्याला मदत मिळण्याची मागणी केल्याचे हर्षवर्धन पाटील म्हणाले. कारखाना टॅक्सचे पुनर्गठन करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. साखर उद्योगाचा पुढील 10 वर्षांचा रोड मॅप तयार केला असल्याचे पाटील म्हणाले. कुठलेही धोरण किमान 10 वर्ष करायचे. साखर वाढली की निर्यात करायची, कमी झाली की निर्यातबंदी करायची यामुळं नुकसान होत असल्याचे हर्षवर्धन पाटील म्हणाले. 


दुधाला 35 रुपये प्रतिलीटर हमी भाव देण्याची मागणी 


दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली आहे. त्यांना प्रस्ताव देऊन दुधाला 35 रुपये प्रतिलीटर हमी भाव देण्याची मागणी केल्याचे हर्षवर्धन पाटील म्हणाले. हा प्रस्ताव अधिवेशनात मान्य करावा अशी आमची अशा आहे. तसेच कायमस्वरुपी दुधाला 5 रुपयांचे अनुदान दिले पाहिजे असेही पाटील म्हणाले. दूध पावडर एक्स्पोर्टला 50 रुपये प्रति टन अनुदान द्यावं असेही ते म्हणाले. दरम्यान, 29 तारखेला विखे पाटील यांनी या प्रस्तावाबाबत बैठक आयोजित केली आहे. या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी केल्याचे हर्षवर्धन पाटील म्हणाले. 


महत्वाच्या बातम्या:


Western Maharashtra : पहिल्यांदा हषवर्धन पाटलांना मोठी जबादारी अन् आता मोहोळ अण्णा अमित शाहांच्या दिमतीला; पश्चिम महाराष्ट्रातील सहकार पुन्हा केंद्रस्थानी!