लातूर  : अभिनेत्री उर्फी जावेद ( Urfi Javed) आणि भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh ) यांच्यातील कलगीतुरा चांगलाच रंगला आहे. या प्रकरणी आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amrita Fadnavis) यांनी आपल्या भूमिकेचं समर्थन केलं आहे, अशी माहिती चित्रा वाघ यांनी दिलीय. "याप्रकरणी अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी घेतलेल्या भूमिकेचं त्यांनी समर्थनच केलं आहे, असे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. चित्रा वाघ या आज लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी लातूरमध्ये पत्रकार परिषद घेत त्यांनी अमृता फडणवीस यांनी आपल्या भूमिकेचं समर्थन केलं असल्याचं म्हटलं आहे. 


"महाराष्ट्र राज्यातील संस्कृती उर्फी जावेद सारखी विकृती सहन करणारी नाही. अशा विकृतीला वेळीच ठेचून काढलं पाहिजे, यासाठी माझा लढा चालूच राहणार आहे.  राज्यामध्ये काही महिला ज्या नंगानाच करतात त्या विकृतीच्या विरोधात मी उभी आहे. माझा हा लढा सातत्याने चालूच राहणार आहे. अशा विकृत महिलांची प्रसिद्धी माध्यमांनी करू नये. महाराष्ट्र राज्याची एक संस्कृती आहे, ती टिकवण्यासाठी आणि तिचं संवर्धन करण्यासाठी मी कटिबद्ध असणार आहे.. त्यामुळे उर्फी जावेद सारख्या लोकप्रियतेसाठी काहीही नंगानाच करणाऱ्या महिलेच्या विरोधात मी सातत्याने भूमिका घेत राहणार, असे मत चित्रा वाघ यांनी मांडली आहे.  


उर्फी एक स्त्री म्हणून जे काही करतेय त्यात मला काहीही वावगं वाटत नाही, असे अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे. आज सकाळी माध्यमांसोबत संवाद साधताना अमृता फडणवीस यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.  


काय म्हटलं अमृता फडणवीस यांनी?


“चित्रा वाघ यांनीही याबाबत भूमिका मांडली आहे की, काहींची व्यावसायिक गरज असते, त्यांना त्याप्रकारचे सीन करावे लागतात. पण तुम्ही केवळ प्रकाशझोतात राहण्यासाठी रस्त्यावर तसं फिरत असाल, तर ते ठीक नाहीये. उर्फी एक कलाकार आहे. उर्फी एक स्त्री म्हणून जे काही करतेय त्यात मला काहीही वावगं वाटत नाही. पण सार्वजनिक ठिकाणी जाताना संस्कृती जपली पाहिजे. तुमचं व्यवसायिक आयुष्य आणि सार्वजनिक आयुष्य वेगळं असतं, असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.  


संजय राऊतांवर टीका


दरम्यान, चित्रा वाघ यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते चित्रा वाघ यांच्यावर देखील यावेळी सडकून टीका केलीय. "सर्वज्ञानी संजय राऊत यांनी लवकर बरे व्हावे अशा सदिच्छा. संजय राऊत यांनी कपड्यावरून वाद नको असं म्हणत राहुल गांधीचे टी-शर्ट आणि उर्फीचे कपडे याला एकाच तराजू तोलले आहे. सर्वज्ञानी संजय राऊत यांना नेमकं काय झालंय? असा प्रश्न यावेळी चित्रा वाघ यांनी उपस्थित केलाय.