Nashik ST Bus : एकीकडे नाशिकसह (Nashik) राज्यातील बससेवा (Bus Service)अडखळत सुरू असताना आता नाशिकमध्ये नव्या लालपरीचा समावेश झाला आहे. एसटीने स्वतःच्या कार्यशाळेत बांधलेली पहिली स्वमालकी बीएस सिक्स बस नाशिकला मिळाली असून नाशिक-धुळे या मार्गावर धावत आहे.
औरंगाबादमधील (Aurangabad) चिखलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेत तयार झालेली पहिली बीएस सिक्स बस (BS 6 Bus) मिळवत नाशिक विभागाने औरंगाबादला धक्का दिला आहे. प्रदूषण नियंत्रणाचे मानकानुसार असलेल्या बसच यापुढे रस्त्यावर धावणार अशा बसेस बनविण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. औरंगाबादच्या चिखलठाणा येथील एसटीच्या मध्यवर्ती कार्यशाळेत पहिली बीएस सिक्स बस तयार होऊन ती नाशिकला मिळाली. गेल्या चार दिवसांपासून ही बस 'नाशिक-धुळे मार्गावर सुरूही इाली आहे. या बसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत असून येत्या काही दिवसांत नाशिकच्या डेपोत आणखी बसेस दाखल होण्याची शक्यता एसटी मंडळ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
भारत स्टेज अर्थात, बीएस सिक्स या मानकाच्या बसेस एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल होत आहेत. प्रदूषण कमी करणारे विशेष इंजिन असलेल्या बसेसची बांधणी महामंडळाच्या चिखलठाणा, पुण्यातील दापोडी आणि नागपूरच्या हिंगणा या मध्यवर्ती कार्यशाळेत सुरु आहे. औरंगाबादेतील चिखलठाणा कार्यशाळेत गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेली पहिली बीएस सिक्स बस बाहेर पडली, तेव्हा ती साहजिकच औरंगाबाद विभागाला मिळू शकेल, असे वाटत असताना ही बस नाशिकच्या ताफ्यात दाखल झाली.
अशा प्रकारची पहिलीच बस मिळविण्यासाठी औरंगाबाद विभागाने आणून मध्यवर्ती कार्यशाळेत एसटीची जोरदार प्रयत्न केले. मात्र, नाशिकमधील बांधणी केली जाते. अशा प्रकारच्या ५० यात्रा-जत्रांचा काळ बघून ही बस बसेस नाशिकच्या ताफ्यात दाखल होणार नाशिकला मिळाल्याचे सांगितले जात आहेत. त्यातील पहिलीच बस नाशिकला मिळाली आहे. त्यामुळे आता आगामी कामात नाशिकच्या एसटी बसला उभारी मिळण्याची शक्यता असून डबघाईला आलेल्या एसी महामंडळाला नक्कीच याचा फायदा होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
अशी आहेत बसची वैशिष्ट्ये....
बीएस सिक्स ही बस 12 मीटर लांबीची असून,जवळपास 45 सीटर हि बस आहे. बसच्या पाठीमागील चाकावर एअर सस्पेन्शन लावण्यात आले आहे. पूर्वी पारंपरिक पद्धतीने पाटा लावले जात होते. त्यामुळे आता बस खड्ड्यातून गेली, तरी प्रवाशांना ते जाणवणार नाही किवा त्रासही होणार नाही. आरामदायी सीट बसमध्ये लावण्यात आल्या आहेत. चाकाच्या पुढील बाजूने बसचा दरवाजा देण्यात आला आहे. फ्रंट आणि विडोच्या काचा मोठ्या देण्यात आलेल्या आहेत.