एक्स्प्लोर

Chandrashekhar Bawankule : शरद पवारांना भाजपसोबत युती हवी होती, पण फडणवीस मुख्यमंत्री नको होते; बावनकुळेंचं मोठं वक्तव्य 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भाजपसोबत युती हवी होती. मात्र, देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री नको होते असं मोठं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय.

Chandrashekhar Bawankule : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना भाजपसोबत युती हवी होती. मात्र, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे त्यांना मुख्यमंत्री म्हणून नको होते, असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule)यांनी केलं आहे. चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी पुण्यात आले असताना बावनकुळेंनी हे वक्तव्य केलं. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होऊ नयेत यासाठी षडयंत्र झालं असल्याचेही बावनकुळे म्हणाले.

शरद पवारांना भाजप चालतो पण फडणवीस नको 

शरद पवारांना भाजप चालतो. त्यांना भाजपसोबत युती हवी होती पण फडणवीस मुख्यमंत्री म्हणून नको होते असं मोठं वक्तव्य बावनकुळे यांनी केलं आहे. शरद पवार यांना देवेंद्र फडणवीस सोडून कुणीही मुख्यमंत्री आणि कुठलाही पक्ष चालला असता असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

फडणवीस मुख्यमंत्री झाले असते तर...

देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होऊ नयेत यासाठी षडयंत्र केल्याचे शरद पवार यांनी मान्य केले आहे. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री होऊ नयेत यासाठी शरद पवार कोणत्याही स्तराला जाऊ शकतात असेही बावनकुळे म्हणाले. भाजप-शिवसेना युती तोडणे, निवडूण आल्यावर उद्धव ठाकरेंना वेगळं करणे हे कशामुळं झालं?  कारण देवेंद्र फडणवीस एकदा मुख्यमंत्री झाले की, महाराष्ट्रात 15 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता मिळणार नाही. 15 वर्ष महाराष्ट्रात भाजपचीच सत्ता असेल ही भीती शरद पवार यांना वाटत होती. म्हणून शरद पवार यांना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ नयेत असे वाटत असल्याचे बावनकुळे म्हणाले. फडणवीस मुख्यमंत्री होऊ नयेत म्हणून पवारांनी क्लुप्त्या आणि युक्त्या लढवल्याचे बावनकुळे म्हणाले.

दोन्ही जागा भाजपच्या  

जेव्हा जेव्हा निवडूक असते तेव्हा तेव्हा भाजप आणि महायुतीचे नेते प्रचाराला येतात. आमच्या दृष्टीनं दोन्ही ठिकाणच्या म्हणजे कसबा आणि चिंचवड या ठिकाणच्या पोटनिवडणुका महत्वाच्या असल्याचे बावनकुळे म्हणाले. या दोन्ही जागा भाजपच्या असल्याचे बावनकुळे यावेळी म्हणाले. 

Sharad Pawar : पहाटेच्या शपथविधीमुळेच राष्ट्रपती राजवट उठली

पहाटेच्या शपथविधीमुळेच राज्यातील राष्ट्रपती राजवट (President Rule ) उठली असल्याचं मोठं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलं. ते चिंचवडमध्ये आयोजीत करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यावेळी सरकार बदलायचा प्रयत्न झाला होता. मात्र, त्याचा एक फायदा झाला, तो म्हणजे राष्ट्रपती राजवट उठली असे पवार म्हणाले. राष्ट्रपती राजवट उठल्यानंतर काय झालं ते तुम्ही पाहिलं असेल, असंही पवार म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

Sharad Pawar : पहाटेच्या शपथविधीमुळेच राष्ट्रपती राजवट उठली; शरद पवारांचं पुण्यात मोठं वक्तव्य

महत्त्वाच्या बातम्या

बळीराजाचे डोळे आभाळाकडे! राज्यात कधी पडणार चांगला पाऊस, पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती
बळीराजाचे डोळे आभाळाकडे! राज्यात कधी पडणार चांगला पाऊस, पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती
साखरेच्या दरात वाढ, पण शेतकऱ्यांच्या पदरात काय? बळीराजाला तब्बल 16 हजार 87 कोटींचा फटका, वाचा नेमकं प्रकरण काय?
साखरेच्या दरात वाढ, पण शेतकऱ्यांच्या पदरात काय? बळीराजाला तब्बल 16 हजार 87 कोटींचा फटका, वाचा नेमकं प्रकरण काय?
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
पावसाची दांडी, पाण्याअभावी पिकं लागली करपू, बनगरवाडीतील शेतकऱ्यांवर गाव सोडण्याची वेळ, ग्रामविकासमंत्र्यांच्या मतदारसंघात भीषण वास्तव  
पावसाची दांडी, पाण्याअभावी पिकं लागली करपू, बनगरवाडीतील शेतकऱ्यांवर गाव सोडण्याची वेळ, ग्रामविकासमंत्र्यांच्या मतदारसंघात भीषण वास्तव  

व्हिडीओ

Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
Embed widget