मुंबई : ईडीकडून सुरु असलेल्या धाडसत्रात तथ्य नसल्याचे राष्ट्रवादीचे नेते सांगत असतात असे असेल तर मुश्रीफ यांच्या जावयाचे 1500 कोटीचे काम सुरु झालेले टेंडर उद्धव ठाकरे यांनी का रद्द केले?  माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची 350 कोटी रुपयाची मालमत्ता का जप्त केली असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी  केला.

Continues below advertisement


फडणवीस पुरावे असल्याशिवाय आरोप करत नाही


 अजित पवार यांच्या निकटवर्तीयांवर होत असलेल्या छापेमारीबाबत जर फडणवीस यांनी 1050 कोटींच्या व्यवहाराबाबत भाष्य केले असेल तर ते नक्की खरे असेल. कारण आजवर फडणवीस पुरावे असल्याशिवाय आरोप करीत नसल्याने त्यांना कधी शब्द मागे घ्यावे लागले नाहीत किंवा कोणाची माफी मागायची वेळ आली नसल्याचा टोला चंद्रकांत पाटील यांनी लागावला. आज मंगळवेढा येथे आमदार समाधान अवताडे यांच्या निवासस्थानी आले असता ते बोलत होते . यावेळी भाजप नेत्या चित्रा वाघ उपस्थित होत्या.


सरकारचे अपयश झाकण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रवक्ते बोलत आहेत
 
सरकारचे अपयश झाकण्यासाठी गेले 25 दिवस एकाच विषय घेऊन राष्ट्रवादीचे प्रवक्ते बोलत आहेत. जर त्यांच्या सांगण्यानुसार शाहरुख खानाचा मुलगा निर्दोष असेल तर कोर्ट त्यांना 26 दिवस जमीन का देत नव्हते असा सवाल करत आता कोर्टाची भाजपचे म्हणून आरोप करा असा टोला लगावला. ज्या पद्धतीने नशेबाजांची बाजू घेतली जात आहे ते शिवसेनेला मान्य आहे का असा सवाल केला.  याची पाळेमुळे कुठपर्यंत जाणार याची भीती असली तरी ते जिथपर्यंत पोचायची आहेत तिथपर्यंत पोचणार असा इशारा दिला.


वानखेडेसारख्या अधिकाऱ्यामागे आता संपूर्ण महाराष्ट्राला उभे राहण्याची वेळ आली आहे


 काही झाले तरी ही नशाखोरी महाराष्ट्रातील तरुणाईला बिघडवणारी असून वानखेडेसारख्या अधिकाऱ्यामागे आता संपूर्ण महाराष्ट्राला उभे राहण्याची वेळ आल्याचे पाटील यांनी सांगितले. ज्या पद्धतीने वानखेडे यांच्या कुटुंबावर राळ उठवणे सुरु आहे ही कोणती पद्धत आहे असा सवाल करत वाझेवर देखील आरोप झाले होते. त्यावेळी तो काय लादेन आहे का असा प्रश्न विचारला जायचा पण आता तो जेलमध्ये आहे असा टोलाही लगावला.या सर्व प्रकारात शिवसेनेची फरपट होत असून नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निकालात सर्वात कमी जागा शिवसेनेला मिळाल्या याचा विचार शिवसेनेने करावा. राष्ट्रवादी कोणाला खातोय हे खुर्ची प्रेमापुढे दिसत नसेल तर त्यामध्ये आमचा नाईलाज आहे  असा टोलाही शिवसेनेला पाटील यांनी लगावला.


देशाला बदनाम करण्याचे काम दोन्ही काँग्रेस आणि शिवसेना करतेय : चंद्रकांत पाटील


देगलूर बिलोली मतदारसंघात भाजपचं विजय होणार


देगलूर बिलोली मतदारसंघात भाजपचं विजय होणार असून हा विजय भाजपच्या कर्तृत्वाचा नसून सरकार बद्दलच्या असंतोषाचा असेल अशी कबुली चंद्रकांत पाटील यांनी दिली. राज्यातील आघाडी सरकारला 27 नोव्हेंबर रोजी दोन वर्षे पूर्ण होत असून हे सरकार त्यांच्यातील अंतर्गत वादात पडणार असून ती पोकळी भाजप भरून काढेल असा पुन्हा एकदा दावा केला