एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

मराठा समाजातील बड्या नेत्यांना नावापुढे बॅकवर्ड लागेल याची भीती वाटते, चंद्रकांत पाटलांचा शरद पवारांवर नाव न घेता निशाणा

मराठा समाजातील श्रीमंत असलेल्या नागरिकांना आरक्षण नको आहे. त्यांना गरीब हा गरीबचं राहिला पाहिजे असं वाटतं. बहुतांश नेत्यांना आपला समाज पुढे यायला नको असं वाटतं, असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं.

कोल्हापूर : मराठा समाजाला आरक्षण दिलं तर आपल्या नावापुढे बॅकवर्ड लागेल अशी भीती मराठा समाजातील बड्या नेत्यांना आहे, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवर नाव न घेता केली आहे. आज कोल्हपुरात पत्रकारांशी बोलत असताना चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणावरुन महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. शिवाय या मुद्द्यावर राज्यात भारतीय जनता पार्टी आक्रमक होईल, असंही दादा म्हणाले.

मराठा समाजाचे नेते म्हणवून घेणाऱ्यांकडे एक दोन नाही तर सलग 15 वर्षे सत्ता होती. त्याच्या आधी देखील कित्येक वर्षे सत्ता होती. मात्र त्यावेळी देखील कधी मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही. मराठा समाजाला आरक्षण दिलं तर त्यांची मुलं शिकतील, मोठी होतील. चांगल्या ठिकाणी नोकरीला लागतील. समाजाचा विकास होईल. पण समाजाचा विकास झाला तर मग आपल्या मागे कोण फिरतील. यांचं राजकारण चालण्यासाठी मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही, असा घणाघाती आरोप चंद्रकांतदादा पाटील यांनी केलाय. बॅकवर्ड फॉरवर्ड ठेवा बाजूला

मराठा समाजातील श्रीमंत असलेल्या नागरिकांना आरक्षण नको आहे. त्यांना गरीब हा गरीबचं राहिला पाहिजे असं वाटतं. बहुतांश नेत्यांना आपला समाज पुढे यायला नको असं वाटतं. जर ते पुढे आले तर आपल्या मागे कोण फिरणार असा त्यांना प्रश्न पडतो. समाजाला गरीब ठेवायचं म्हणजे ते सांगतील त्याठिकाणी मतदान करुन घेतात, अशी टीका देखील चंद्रकांत पाटलांनी आज कोल्हापुरात बोलताना केली.

प्रकाश आंबेडकर यांच्या मताशी सहमत

प्रकाश आंबेडकरांनी टीका केली की, मराठा समाजातील श्रीमंतांनी गरीब मराठा समाजाला पुढे आणलं नाही. त्यांच्या मताशी मी सहमत आहे. कारण श्रीमंत असलेल्या मराठा नागरिकांना आपल्या नावापुढे बॅकवर्ड हा शब्द नको आहे. आम्ही फॉरवर्डच असल्याचं ते मानतात, असंही वक्तव्य आज चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
Supreme Court : 104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
SKOCH Award :'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Satara : एकनाथ शिंदेंची तब्येत बिघडली, ताप आल्यानं आराम करण्याचा डॉक्टरांचा सल्लाAjit pawar On EVM : विरोधकांकडून नुसता रडीचा डाव सुरु आहे, अजितदादांचा हल्लाबोल #abpमाझाMahayuti Oath Ceremony :  5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता नव्या सरकारचा शपथविधीUddhav Thackeray On Mahayuti :विधानसभेची मुदत संपल्यानंतरही राष्ट्रपती राजवट का लागू केली नाही-ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
Supreme Court : 104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
SKOCH Award :'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
सरकारी नोकरीची संधी, 'असिस्टंट ऑफिसर' पदासाठी 50 जागांवर भरती, एनटीपीसीमध्ये आजच करा अर्ज
सरकारी नोकरीची संधी, 'असिस्टंट ऑफिसर' पदासाठी 50 जागांवर भरती, एनटीपीसीमध्ये आजच करा अर्ज
अहमदनगरमध्ये चेष्टा मस्करी जीवावर बेतली, मित्राकडून मित्राचा अनावधानाने खून; गुन्हा दाखल
अहमदनगरमध्ये चेष्टा मस्करी जीवावर बेतली, मित्राकडून मित्राचा अनावधानाने खून; गुन्हा दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर, शनिवार 30 नोव्हेंबर 2024
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर, शनिवार 30 नोव्हेंबर 2024
Shardul Thakur : कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
Embed widget