Chandrakant Patil : नारायण राणे (Narayan Rane) अशा सगळ्या कारवायांना समर्थ आहेत. त्यांचे संपूर्ण आयुष्य संघर्ष करण्यात गेलं आहे. परंतू, ज्या पद्धतीने सध्या सत्तेचा दुरुपयोग सुरू आहे, तो दुरुपयोग कोर्टात टिकणार नसल्याचे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. शिवसेनेची (Shiv Sena) सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेने नारायण राणे यांना नोटीस बजावली होती. नारायण राणेंच्या जुहूतल्या अधीश बंगल्याची पाहणी करण्यासाठी मुंबई महापालिकेचे पथक रवाना झाले आहे. नारायण राणे विरूद्ध शिवसेनेच्या या वादावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 


आम्ही नारायण राणे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, काय होतं ते बघू, असेही पाटील यावेळी म्हणालेत. राणे साहेबांनी परवा एक सूचक वक्तव्य केलं आहे. मुंबईमधल्या अशा मोठ्या हजार बंगल्यांची यादी निघेल आणि त्या हजार बंगल्यामधले पहिले 100 बंगले हे शिवसेनेचे असतील, असा टोला देखील चंद्रकांत पाटील यांनी सेनेला लगावला. जे करायचे ते बोलण्याची काही आवश्यकता नसल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले.


महाविकास आघाडीने आंदोलनाची एक चुकीची परंपरा सुरु केली आहे. ते महागात पडेल, कारण एक trend पडला तर त्या trend च्या दिशेने सगळे लोक जातात. घरासमोर आंदोलन ही महाराष्ट्रात कधी झाली नाहीत. तुम्हाला आंदोलने करायची असतील तर त्या संबंधित ऑफिस कार्यालयाच्या समोर आंदोलन करा असेही चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले. 


नारायण राणे यांच्या मुंबईतील जुहूमध्ये अधीश नावाचा बंगला आहे. या बंगल्याबाबत अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार होती. तारा रोडवर उभारण्यात आलेल्या या बंगल्याच्या बांधकामांमुळे सीआरझेड नियमांचे उल्लंघन होत असल्याची तक्रार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या के पश्चिम विभागाच्या बिल्डिंग प्रपोजल विभागाने याबाबत नोटीस बजाावण्यात आली होती. त्यसंदर्भात घराची पाहणी आणि काही कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी पालिकेचे अधिकारी राणेंच्या बंगल्यात आले आहेत. 


महत्त्वाच्या बातम्या: