1. काँग्रेसशिवाय भाजपविरोधी पक्षांची मोट बांधणं अशक्य, तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर काँग्रेस नेत्यांची प्रतिक्रिया


2. महाराष्ट्रद्वेषी लोकांना जी भाषा समजते त्याच भाषेतच बोलावं; किरीट सोमय्यांवर टीका करताना उच्चारलेल्या अपशब्दांवर संजय राऊत ठाम, तर भाजप आक्रमक 


3. मुंबई महापालिकेचं पथक राणेंच्या जुहू बंगल्यावर धडकण्याची शक्यता, अनियमिततेच्या आरोपांवरुन बजावलेल्या नोटीशीनंतर राजकारण शिगेला, तर आदित्य ठाकरे राणेंचा बालेकिल्ला असलेल्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर


सिंधुदुर्ग :  एकीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचा जुहू परिसरातील अधीश या बंगल्यावर कारवाईची टांगती तलवार आहे. या नोटिशीवरुन राणे कुटुंबीय आक्रमक झाले असतानाच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आज राणेंच्या बालेकिल्ल्यात असतील. आदित्य आज सिंधुदुर्ग (Sindhudurg) दौऱ्यावर आहेत. आधी म्याव म्याव प्रकरण आणि त्यानंतर संतोष परब हल्लाप्रकरणी नितेश राणेंना झालेल्या अटकेनंतर आदित्य यांचा पहिलाच सिंधुदुर्ग दौरा आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे काय बोलणार याकडं लक्ष लागलं आहे.   


महापालिकेचं पथक केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुंबईत जुहू इथल्या बंगल्यावर


केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुंबईतल्या जुहू इथल्या अधीश बंगल्याची पाहणी करण्यासाठी मुंबई महापालिकेचं पथक रवाना झालं आहे. राणे यांच्या बंगल्याची पाहणी करण्यासंदर्भात मुंबई महापालिकेनं याआधीच नोटीस बजावली आहे नारायण राणे विरुद्ध शिवसेना हा राजकीय कलगीतुरा रंगला असताना आता त्यात बंगल्यावरुन सुरु झालेल्या वादाची भर पडलीय. दरम्यान आजच्या पाहणीनंतर मुंबई महापालिकेच्या पथकाला नारायण राणेंच्या बंगल्यात अनियमितता आढळणार का ? आणि आढळली तर अधीश बंगल्यावर कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


4 . मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा या मागणीसाठी महाराष्ट्राचं शिष्टमंडळ दिल्लीत, सांस्कृतिक राज्यमंत्र्यांना भेटणार, प्रलंबित मागणीसाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांची स्वाक्षरी मोहीम 


5. बॉम्बस्फोटासाठी दहशतवाद्यांकडून सायकलचाच वापर का? सवाल उपस्थित करत मोदींचा समाजवादी पार्टीवर निशाणा, उत्तर प्रदेश निवडणुका सुरु असताना पंतप्रधानांच्या वक्तव्याची चर्चा 


पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 21 फेब्रुवारी 2022 : सोमवार



6. डोंबिवली ठाकुर्ली उड्डाणपूल वाहतुकीसाठी  दोन दिवस बंद, वारंवार खड्डे पडत असल्याने पुलाची दुरुस्ती करणार, कोपर पुलाचा वापर करण्याचं आवाहन


7.  वसई- विरारच्या ग्रामीण भागात बर्ड फ्लूचा शिरकाव, 800 हून अधिक कोंबड्यांचा मृत्यू, प्रशासनाकडून जवळपास 3 हजार पक्षी नष्ट


8. जम्मू काश्मीरच्या शोपियांमध्ये झालेल्या चकमकीत सांगली जिल्ह्यातल्या रोमित चव्हाण यांना वीरमरण, आज सांगलीतील मूळगावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार


9. युक्रेन रशिया सीमेवर तणाव वाढला, पुतिन यांच्या उपस्थितीत रशियाकडून अत्याधुनिक क्षेपणास्त्रांची चाचणी, भारतीय नागरिकांना मायदेशात परतण्याची भारतीय दूतावासाची सूचना


10. वन-डे मालिकेपाठोपाठ टी-20 मालिकेत भारताकडून वेस्ट इंडिजला क्लीन स्वीप, तिसरा सामना जिंकत मालिकेवर निर्विवाद वर्चस्व