एक्स्प्लोर

मोदींच्या नव्या शिलेदारांच्या नेतृत्वात भाजपची 'जन आशीर्वाद यात्रा', सोमवारपासून महाराष्ट्र पिंजून काढणार

महाराष्ट्रासह 22 राज्यांमध्येही यात्रा निघणार आहे. तब्बल 19 हजार 567 किमी प्रवास केंद्रीय मंत्री करणार आहे.

 मुंबई : येत्या 16 ऑगस्टपासून महाराष्ट्रातील अनेक भागात नव्यानं झालेले केंद्रीय मंत्री आणि राज्यमंत्री यांच्या यात्रेचं नियोजन भाजपतर्फे केले जात आहे. 'जन आशीर्वाद' यात्रा असं नाव याला दिलं आहे.

नारायण राणे, भारती पवार, कपिल पाटील, भागवत कराड या मोदींच्या मंत्रिमंडळात नव्याने समावेश झालेले हे नेते महाराष्ट्रभर जन आशीर्वाद यात्रा काढणार आहेत. आपापल्या मतदार संघात न जाता इतर जिल्ह्यात या मंत्र्यांचा दौरा असणार आहे. लोकांशी संवाद साधण्यासोबतच केंद्रातील योजनांची माहिती देखील ते जनतेला देणार आहेत. भाजपच्या वतीने देशभर हा कार्यक्रम आखला गेला आहे.

देशभरातील 39 मंत्री जन आशीर्वाद यात्रेत सहभागी होणार  आहे. महाराष्ट्रासह 22 राज्यांमध्येही यात्रा निघणार आहे. तब्बल 19 हजार 567 किमी प्रवास केंद्रीय मंत्री करणार आहे. या यात्रेदरम्यान दीड हजारहून अधिक ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. 212 लोकसभा मतदारसंघापर्यंत पोहोचण्याचा भाजप  प्रयत्न करणार आहे. महाराष्ट्रात नारायण राणे, कपिल पाटील, भारती पवार, भागवत कराड यात्रा करतील. नारायण राणे 20 ऑगस्टपासून यात्रा सुरू करतील

नारायण राणे यांच्यावर मुंबईसह कोकणाची जबाबदारी देण्यात आली आहे. भारती पवार पालघर जिल्हयातील आदिवासी भाग आणि उत्तर महाराष्ट्रात यात्रा करणार आहेत. कपिल पाटील यांच्याकडे ठाणे, नवी मुंबईची जबाबदारी आहे. तर मराठवाड्यात भागवत कराड आणि रावसाहेब दानवे हे जन आशीर्वाद यात्रेचे नेतृत्व करणार आहेत.

महाराष्ट्रातून नव्याने मंत्री झालेले चारही नेते आयात उमेदवार आहेत. भागवत कराड वगळता इतर नेत्यांना भाजप फारशी अंगवळणी पडली नाही. त्यामुळे या यात्रेच्या निमित्ताने या मंत्र्यांना भाजप कार्यकर्त्यांशी आणि मतदारांची जोडणे हा प्रमुख उद्देश आहे. शिवाय येणाऱ्या काळात महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. या निवडणुकीपूर्वी मोदी सरकारने केलेली कामगिरी जनतेपर्यंत पोहोचवली जाणार आहे. त्यामुळे या जन आशीर्वाद यात्रेनंतर लोकांचे आशीर्वाद भाजपाला मिळतात का हे बघावं लागेल. 

संबंधित बातम्या :

PM Modi Cabinet Expansion :महाराष्ट्रातील दोन केंद्रीय मंत्र्यांचा राजीनामा तर नवीन चौघांना मंत्रिपदं, केंद्रात राज्यातले 'इतके' मंत्री!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour | जगाची सफर | वर्ल्ड फटाफट | जगभरात काय घडलं? कोणत्या बातमीनं जगाचं लक्ष वेधलं ?Ashok Dhodi Palghar : कारमध्ये सापडलेला मृतदेह अशोक धोडी यांचाच, पोलिसांची माहितीJob Majha : जॉब माझा :भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र येथे विविध पदांसाठी भरती :ABP MajhaBuldhana : बुलढाणा केसगळती प्रकरण, गावातील नागरिकांच्या रक्तात, केसात हेवी मेटल असलेलं 'सेलेनियम'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
Embed widget