मुंबई: व्यक्तिगत जीवनामध्ये आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय, पण एका फोटोमुळे जर कुणाची इमेज खराब करता येते असं जर एखाद्याला वाटत असेल तर ते शक्य नाही. आपण हाँगकाँगला परिवारासोबत गेलो होतो, पण त्या ठिकाणी प्रत्येक हॉटेलमध्ये कसिनो असतो, त्याला क्रॉस करून जाताना कुणीतरी तो फोटो काढल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी सांगितलं. शिवसेनेचे खासदार संजय राऊत  (Sanjay Raut) यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचा मकाऊ कसिनोमधील एक फोटो (Chandrashekhar Bawankule Hing Kong Macau Casino Photo) केला होता. त्यामध्ये बावनकुळे यांनी कसिनोमध्ये तीन तासात तीन कोटी उधळल्याचा आरोपही केला होता. त्यावर आता बावनकुळे यांनी पहिलीच प्रतिक्रिया दिली. 


कुटुंबासोबत हाँगकाँगला गेलो होतो


चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, अशा कुठल्या फोटोच्या आधारावर कुणाला इमेज खराब करता येत नाही. मोठा संघर्ष करून आम्ही इथेपर्यंत आलो आहे. यामुळे परिवाराला ज्या पद्धतीने त्रास द्यायचा प्रयत्न झाला तो चुकीचा आहे. मी महिन्याभरातून एकदाच घरी जातोय. त्यावेळी माझ्या कुटुंबाने तीन दिवसांचा वेळ मागितला आणि आम्ही हाँगकाँगला गेलो. त्या ठिकाणी कोणत्याही हॉटेलमध्ये गेला तरी कसिनो आहेच. त्याला क्रॉस करूनच तुम्हाला तुमच्या रुमपर्यंत किंवा जेवणाच्या ठिकाणापर्यंत जावं लागतं. त्याचवेळी कुणीतरी हा फोटो काढला आणि बदनामी करण्याचा प्रयत्न केला. 


साडेतीन कोटी रुपये परदेशात नेता येतात का? 


चंद्रशेखर बावनकुळे पुढे म्हणाले की, त्या फोटोवरून आपल्याला आणि आपल्या परिवाराला, व्यक्तिगत जीवनामध्ये बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला, राजकीयदृष्ट्या बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. साडे तीन कोटी रुपये परदेशात नेता येत नाहीत. एक लाख रुपये नेले तरीही तीन तीन वेळा चेकिंग केली जाते. माझे कुणीही मित्र नाहीत, किंवा हाँगकाँगमध्ये माझा पैसाही नाही. त्यामुळे इतके पैसे मी खर्च करण्याचा प्रश्नच येत नाही. तसेच ज्यांना पैशाच्या या पळवाटा माहिती आहेत त्यांनीच हे आरोप केले आहेत. हा राजकारणाचा भाग आहे. 


काय म्हणाले होते संजय राऊत? 


शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे मकाऊमध्ये कसिनो खेळत असल्याचं सांगत एक फोटो शेअर केला होता.  







 
ही बातमी वाचा: