मुंबई: चंद्रशेखर बावनकुळेंचे (Chandrashekhar Bawankule) मकाऊ कॅसिनोमधील 27 फोटो आणि 5 व्हिडीओ आपल्याकडे आहेत, भाजपने आपले सगळे उद्योग बंद करावेत नाहीतर व्हिडीओ टाकावे लागतील असा इशारा संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिला आहे. भाजपने आरोप करण्यापेक्षा त्याचं उत्तर द्यावं असं आव्हानही त्यांनी दिलं. मोदी जे परदेशात जाऊन पितात, तो ब्रँड आदित्य ठाकरे यांचा असल्याचं सांगत त्यांनी भाजपला टोला लगावला आहे. 


चंद्रशेखर बावनकुळे यांचा मकाऊमधील कॅसिनोमधील एक फोटो संजय राऊत यांनी शेअर केला होता. त्यानंतर भाजपने त्याला उत्तर देताना आदित्य ठाकरे यांच्या एक फोटो शेअर केला. त्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, चंद्रशेखर बावनकुळे यांनी मकाऊमधील कॅसिनोमध्ये एका रात्रीत साडेतीन कोटी रुपये उडवले, पैसे डॉलर्समध्ये उडवले. त्याचे 27 फोटो आणि 5 व्हिडीओ आपल्याकडे आहेत. हे टाकले तर भाजपला दुकान बंद करावं लागेल. 


मकाऊमध्ये आमची ईडी आणि सीबीआय


माझ्यावर किती लोकांनी टीका केली, पण आम्ही त्या पातळीवर जाऊ शकतो पण जात नाही असं सांगत संजय राऊत म्हणाले की, जेवढं खोटं बोलाल तेवढं फसाल. प्रति आरोप नको उत्तर द्या. बावनकुळे त्या ठिकाणी नसतील तर त्यांनी मी तो नव्हेच असं स्पष्ट सांगावं. भाजपकडे देशात ईडी आणि सीबीआय आहे, आमच्याकडे मकाऊमध्ये ईडी आणि सीबीआय आहे. बावनकुळेंनी तीन तासांमध्ये साडे तीन कोटी रुपये उधळले, बाकी किती खर्च झाला याचा तपास करावा. आपण एक जबाबदार व्यक्ती आहोत, कुटुंबासोबत आहोत याचं त्यांनी भान ठेवावं. 


आदित्य ठाकरेंचा आणि मोदींचा ब्रँड सेम


आदित्य ठाकरेंच्या व्हायरल होणाऱ्या फोटोवर प्रश्न विचारल्यानंतर संजय राऊत म्हणाले की, मोदी परदेशात जाऊन जे पितात तेच आदित्य ठाकरे पितात, मोदींचा आणि आदित्य ठाकरेंचा ब्रँड सेम आहे. 


शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे मकाऊमध्ये कसिनो खेळत असल्याचं सांगत एक फोटो शेअर केला होता.  






ही बातमी वाचा: