एक्स्प्लोर
सोलापुरात मोठा पक्ष राष्ट्रवादी, मात्र झेडपी अध्यक्ष भाजप महाआघाडीचा !

सोलापूर : जिल्हा परिषद अध्यक्षपदी भाजप महाआघाडीचे उमेदावर संजय शिंदे, तर उपाध्यक्षपदी शिवानंद पाटील यांची निवड झाली आहे. सोलापुरात मोहित पाटलांच्या नेतृत्त्वाला मोठा सुरुंग लागला आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचं बहुमत मिळवंण्याचं संख्याबळ असताना देखील भाजप महाआघाडीन चमत्कार घडवण्याचा दावा केला होता. अखेर भाजप महाआघाडीचाच उमेदवार जिल्हा परिषद अध्यक्षपदी बसला आहे. अध्यक्षपदी निवडून आलेले संजय शिंदे हे राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे यांचे बंधू आहेत, तर उपाध्यक्षपदी निवड झालेले शिवानंद पाटील हे अक्कलकोटचे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांचे पुत्र आहेत. ते अपक्ष म्हणून निवडून आले आहेत. जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता आल्याने आता सोलापुरातील राजीकय समीकरणंही बदलणार आहेत. या निवडणुकीत उमेश परिचारक आणि संजय शिंदे या जोडगोळीची रणनीती यशस्वी ठरली आहे. काँग्रेसच्या सात मतांमध्ये फाटाफूट होऊ नये, यासाठी पक्षाचे निरीक्षक मोहन जोशी सोमवारी सोलापुरात आले होते. मात्र, त्यांनी बोलावलेल्या बैठकीला काँग्रेसच्या सात सदस्यांपैकी एकही सदस्य हजर नव्हता. 68 सदस्यांच्या सोलापूर जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबल : राष्ट्रवादी – 23 काँग्रेस – 7 दीपक साळुंखे व गणपतराव देशमुख – 5 भाजप – 14 शिवसेना – 5 परिचारक गट – 3 शहाजीबापू पाटील – 2 महाडिक गट – 3 समाधान आवताडे गट – 3 संजय शिंदे यांचे – 2 सिद्रामप्पा पाटील गट- १ महाडिक गट- ३ समाधान आवताडे गट- ३ संजय शिंदे गट – २ सिद्रामप्पा पाटील गट- १
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
बुलढाणा
राजकारण
पुणे























