नागपूर: नागपुरमध्ये आज सकल मराठा-कुणबी मोर्चाच्या वतीनं बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. यशवंत स्टेडिअमपासून ही बाईक रॅली काढण्यात आली. बाईकवर भगवे झेंडे, अंगात काळे कपडे आणि डोक्यावर हेल्मेट घालून हजारो मोर्चेकरी आजच्या रॅलीत सहभागी झाले होते.
दरम्यान, १४ तारखेला विधानभवनावर मराठा मोर्चाचं आयोजन केलं आहे. त्या पार्श्वभूमीवर ही बाईक रॅली रंगीत तालीम समजली जाते आहे. मराठा आरक्षणाबद्दल हिवाळी अधिवेशनातच सरकारनं ठोस पावलं उचलावीत, अशी प्रमुख मागणी या बाईक रॅलीत करण्यात आली.
तर दुसरीकडे 14 तारखेच्या मराठा मोर्चासाठी राज्यभरातून मराठा समाजाचे बांधव उपस्थीत राहतील असा, अंदाज आयोजकांनी व्यक्त केला आहे. यासाठी वाशिम आणि मुंबई सीएसटी अशा दोन ठिकाणाहून विशेष ट्रेन निघणार असून, त्यासाठी रेल्वेच्या तारखा आणि वेळेचं नियोजनही सुरु झालं आहे.