Bicycles Price Rise : महागाईने सर्व जनता त्रस्त झालेली असताना पेट्रोल-डिझेलचे भाव सुद्धा गगनाला भिडले आहेत. त्यामध्ये सर्वसामान्य नागरिक आशा आणि अपेक्षेने सायकलकडे बघू लागले आहेत. परंतु सायकलचे भावसुद्धा लग्नाला भिडताना दिसून येत आहेत. हिंगोलीच्या बाजारपेठेमध्ये मागील पाच वर्षांच्या तुलनेत सायकलचे भाव आहेत. सायकलचे दर 25 ते 50 टक्क्यांनी वाढले आहेत.  


पेट्रोलचे भाव वाढल्यानं नागरिकांनी सीएनजी आणि इलेक्ट्रिकल वाहनांना पसंती दिली आहे. मात्र त्यांच्याही किमती जास्त असल्यानं नागरिकांनी सायकलकडे मोर्चा वळवला होता. परंतु सायकलचेसुद्धा भाव वाढल्यानं आता नागरिकांना नवा पर्याय शोधणं काळाची गरज बनली आहे. 


स्वतःला फिट आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी अनेक नागरिक सकाळी सायकलचा प्रवास करण्याला पसंती देऊ लागले. यामुळे गिअरच्या सायकलचा आविष्कार झाला. परंतु या महागाईच्या काळात गिअरच्या सायकलींचेसुद्धा भाव वाढले आणि चक्क पंधरा हजार ते पन्नास हजारांपर्यंत गिअरच्या सायकलचे दर असल्याचं विक्रेत्यांकडून सांगितलं जात आहे. त्यामुळे आता सायकलिंग करणारेसुद्धा या सायकलच्या भाववाढीमुळे त्रस्त असल्याचं दिसून येत आहे. 


इंधन दरवाढ आणि कच्च्या मालाच्या दरात वाढ झाली आहे. त्याचबरोबर लोखंडाच्या किमती वाढल्यानं सायकलचे भाव वाढले आहेत. याला दुसरं एक कारण महत्त्वाचं ठरत आहे ते म्हणजे, कोरोना काळात नागरिकांनी आरोग्याला दिलेलं महत्त्व. त्यासाठी सर्व नागरिकांनी सायकलिंगला मोठी पसंती दिल्याचं एका अहवालात स्पष्ट झालं आहे. त्यानुसार सायकल खरेदी करण्याचं प्रमाणसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. मागणी वाढल्यामुळं सायकलच्या किमती वाढल्याचं सायकल विक्रेत्यांच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.  


बाजारामध्ये आता मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिकल सायकल देखील उपलब्ध झाल्या आहेत. कारण इलेक्ट्रिकल सायकलची मागणी देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या सायकलीची किंमत साधारण पंधरा ते वीस हजार रुपयांच्या दरम्यान असल्याचं सांगितलं जात आहे. त्याच तुलनेत गिअरची सायकल दहा ते पंधरा हजार रुपये किमतीच्या दरम्यान मिळते. त्यामुळे या दोन्ही प्रकारच्या सायकलींची मागणी सायकल प्रेमींकडून मोठ्या प्रमाणात केली जात आहे. दरम्यान, वाढत्या महागाईच्या काळात या सायकली भाव खाणार हे मात्र निश्चित झाला आहे. परंतु या भाववाढीचा फटका हा सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार हे मात्र नक्की. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Petrol-Diesel Price : दिलासादायक 97 दिवस! पेट्रोल-डिझेलचे आजचे दर काय? जाणून घ्या



दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा