मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्ण हजारे यांच्या उपोषणाला आता भूमाता महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनीही पाठिंबा दिला आहे. अण्णांच्या उपोषणावरुन तृप्ती देसाई यांनी व्हिडीओ जारी करुन राज्य सरकारला धमकी दिली आहे. "अण्णा हजारे यांची मागणी लवकरात लवकर मान्य न केल्यास, भूमाता महिला ब्रिगेड मंत्र्यांच्या गाड्या फोडेल आणि रस्त्यावर उतरुन आंदोलन करेल," असं तृप्ती देसाई म्हणाल्या.


यासोबत देसाई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या की, "बॉलिवूड हिरो-हिरोईनींना भेटण्यासाठी, त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी मोदींकडे वेळ आहे. पण अण्णा हजारे यांच्याशी बातचीत करण्यासाठी आणि त्यांना भेटण्यासाठी मोदींकडे वेळ नाही."

दरम्यान, अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. लोकपाल नियुक्तीसाठी अण्णा हजारेंचं राळेगणसिद्धीमध्ये उपोषण सुरु आहे. दुसरीकडे अण्णा हजारेंच्या मनधरणीचे सरकारचे प्रयत्न पुन्हा एकदा निष्पळ ठरले आहेत. अण्णांच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री सुभाष भामरे आणि गिरीश महाजन राळेगणसिद्धीत पोहोचले होते. यावेळी दोन्ही मंत्र्यांनी अण्णा यांच्याशी चर्चा करुन मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोडगा निघाला नाही. केंद्राच्या प्रस्तावावर समाधान न झाल्याने अण्णा उपोषणावर ठाम आहेत. स्वामीनाथन आयोगावर मंत्र्यांचा अभ्यास नाही असा आरोप अण्णांनी केला आहे.

संबंधित बातम्या

सुभाष भामरे-गिरीश महाजनांसोबतची बैठक निष्फळ, अण्णा उपोषणावर ठाम

लोकपालसाठी रान पेटवणारं भाजप आता गप्प का? अण्णांचा सवाल

हे सरकार गाडण्यासाठी मी अण्णांसोबत आहे : राज ठाकरे


राज ठाकरे राळेगणसिद्धीत, अण्णांना उपोषण सोडण्याची विनंती


...तर 'पद्मभूषण' पुरस्कार परत करणार : अण्णा हजारे


अण्णा हजारेंच्या जीवाशी खेळू नका : उद्धव ठाकरे


अण्णांची प्रकृती ढासळली, ग्रामस्थ आक्रमक, महाजन राळेगणसिद्धीला निघाले


अण्णा हजारेंची नवाब मलिकांना कायदेशीर नोटीस