एक्स्प्लोर
Advertisement
भुजबळांच्या समता परिषदेला खिंडार
औरंगाबादः माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या समता परिषदेला मोठं खिंडार पडलं आहे. कारण समता परिषदेतून माळी समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या सावता परिषदेमध्ये प्रवेश केला आहे.
सावता परिषदेच्या औरंगाबादमधील मेळाव्यात या पदाधिकाऱ्यांचं स्वागत करण्यात आलं. भाजपचे आमदार अतुल सावे हे सावता परिषदेचे नेतृत्व करत आहेत.
छगनराव म्हेत्रे, सुहास शिरसाठ, बाळासाहेब माळी आदी पदाधिकाऱ्यांना सावता परिषदेमध्ये प्रवेश केला आहे. या पदाधिकाऱ्यांच्या सोबत शेकडो कार्य़कर्त्यांनी सावता परिषदेमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळं आधीच अडचणीत सापडलेल्या छगन भुजबळांची आता कार्यकर्तेही साथ सोडत असल्याचं दिसतंय.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
म्युच्युअल फंड्स
महाराष्ट्र
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement