एक्स्प्लोर

भोसरी जमीन खरेदीत खडसेंचा सहभाग, एमआयडीसीचा युक्तीवाद

नागपूर : भोसरी जमीन खरेदी प्रकरणी एमआयडीसीने झोटिंग समितीसमोर आपला युक्तीवाद पूर्ण केला. जमीन खरेदीत माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा सहभाग दिसतो, असा युक्तीवाद यावेळी एमआयडीसीकडून करण्यात आला. झोटिंग समितीसमोर एमआयडीसीचा युक्तिवाद जमीनीची नुकसानभरपाई उकानी यांना न मिळाल्याने त्यांना जमीन विक्रीचा अधिकार होता, असा दावा एकनाथ खडसेंनी केला होता. मात्र पूर्ण पुरावा नोंदणी आणि युक्तीवाद आटोपल्यावर खडसे यांनी आपला बचाव बदलला आणि मला यात काहीच माहिती नाही, असा पवित्रा घेतला. त्यामुळे खडसे सत्य लपवत असल्याचा दावा एमआयडीसीने केला. उकानी खडसेंच्या सचिवाला भेटले. त्यामुळे खडसेंनी त्वरित अधिकाऱ्यांची बैठक आपल्या बंगल्यावर बोलावली. याबाबतीत एवढी तत्परता का, याचं कारण काय आणि एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना उद्योगमंत्र्यांची परवानगी न घेता का बोलावलं, असा सवाल यावेळी करण्यात आला. याप्रकरणी काहीही माहिती नाही हा खडसेंचा पवित्रा अविश्वसनीय दिसतो. 23 फेब्रुवारी 2016 रोजी त्यांनी बैठक आयोजित केली होती.  28 मार्च 2016 खडसेंच्या कुटुंबियांनी कोलकाता येथे जाऊन करार केला आणि 50 लाख रुपये अग्रीम देण्यात आले. 12 एप्रिल 2016 रोजी खडसेंनी पुन्हा एकदा या जमिनीसंबंधी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. 28 एप्रिल 2016 रोजी विक्रीपत्र झालं, असा युक्तीवाद एमआयडीसीने केला. खडसेंना या व्यवहाराची माहिती 6 जून 2016 ला मिळाली, तर 4 जून रोजी त्यांनी राजीनामा का दिला, असा सवालही यावेळी करण्यात आला. सरकारने एमआयडीसीसाठी एखादी जमीन नियोजित केली की त्या जमिनीवर सरकारचा ताबा येतो. जमीन मालक हा केवळ नुकसानभरपाईचा हकदार राहतो. त्यामुळे उकानी यांच्याकडून करवून घेतलेलं विक्रीपत्र अवैध ठरतं, यावर एमआयडीसीने युक्तीवाद केला. दरम्यान या युक्तीवादाला उत्तर देण्यासाठी खडसेंच्या वकिलाने उद्यापर्यंत वेळ मागितला आहे. भोसरी जमीन खरेदीप्रकरण काय आहे? भोसरी एमआयडीसीमधील सर्व्हे नंबर 52 मधील तीन एकर जागेचा हा वाद आहे. ही जमीन खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीष चौधरी यांनी अब्बास उकानी या व्यक्तीकडून, तीन कोटी 75 लाख रुपयांना खरेदी केली. पुण्यातील उपनिबंधक कार्यालयात या व्यवहाराची नोंद करून स्टँप ड्युटी म्हणून एक कोटी 37 लाख रुपये देखील भरण्यात आले. पण ही जमीन एमआयडीसीच्या मालकीची असल्याचं उघड झालं. महसूलमंत्री असताना खडसेंनी भोसरीत केलेल्या खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आले. त्यानंतर याप्रकरणाच्या चौकशीसाठी एका वर्षापूर्वी निवृत्त न्यायाधीश झोटिंग यांच्या एक सदस्यीस समितीची स्थापना करण्यात आली आहे. संबंधित बातम्या :

भोसरी जमीन प्रकरण: खडसेंनी जबाब बदलला?

भोसरी जमीन घोटाळ्याप्रकरणी खडसेंविरोधात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू

भोसरी जमीन खरेदी प्रकरण, खडसेंची झोटिंग समितीसमोर हजेरी

 तथ्यहीन आरोपांना उत्तर देणार नाही : खडसे

खडसेंना पक्षाची भूमिका कळवा, शाहांच्या आदेशानंतर गडकरींचा खडसेंना फोन

‘तो’ अहवाल खडसेंच्या बाजूनंही असू शकतो: रावसाहेब दानवे

विधानपरिषद निवडणुकीनंतरच खडसेंचा फैसला

एकनाथ खडसे राजीनामा द्या : शिवसेना

एकनाथ खडसेंचं महसूलमंत्रिपद जाणार?

खडसेंची खुर्ची धोक्यात, अमित शहांनी अहवाल मागवला

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 सप्टेंबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 सप्टेंबर 2026 | मंगळवार
संजय राऊतांचे FDA च्या अधिकाऱ्यांवर धक्कादायक आरोप, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया समोर, म्हणाले तुमच्याकडे...
संजय राऊतांचे FDA च्या अधिकाऱ्यांवर धक्कादायक आरोप, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया समोर, म्हणाले तुमच्याकडे...
सुस्साट कारची दुचाकीला पाठीमागून धडक, भीषण अपघातात पती ठार, पत्नी जखमी, स्कुटीचालकाच्या हातालाही फ्रॅक्चर
सुस्साट कारची दुचाकीला पाठीमागून धडक, भीषण अपघातात पती ठार, पत्नी जखमी, स्कुटीचालकाच्या हातालाही फ्रॅक्चर
Climate Week India 2026: हवामान सुरक्षेसाठी अन् पर्यावरणासाठी मोठा उपक्रम; ‘क्लायमेट वीक इंडिया’मध्ये पुण्यात खास कार्यक्रमांचे आयोजन
हवामान सुरक्षेसाठी अन् पर्यावरणासाठी मोठा उपक्रम; ‘क्लायमेट वीक इंडिया’मध्ये पुण्यात खास कार्यक्रमांचे आयोजन

व्हिडीओ

Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Sanjay Raut on FDA Tukaram Mundhe : धाड मुंढेंची, कमाई अधिकाऱ्यांची?राऊतांच्या पत्राने खळबळ
Sanjay Raut alleges FDA Extortion : एफडीएत खंडणीचं सत्र? राऊतांचं मुंढेंना पत्र | Special Report
Vidhan Parishad Election & Mahayuti : विधान परिषदेचा पेच महायुतीत रस्सीखेच | Special Report ABP Majha
Sharad Pawar On NCP Merger : हवं तर इकडे, फुलस्टॉप की साकडं? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तब्बल 56 लाख नोटांचे बंडल, 355 ग्रॅम सोनं, मालमत्तेची कागदपत्रे अन् बरंच काही; लेडी ड्रग माफियाच्या घरातून खजिना सापडला!
तब्बल 56 लाख नोटांचे बंडल, 355 ग्रॅम सोनं, मालमत्तेची कागदपत्रे अन् बरंच काही; लेडी ड्रग माफियाच्या घरातून खजिना सापडला!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 सप्टेंबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 सप्टेंबर 2026 | मंगळवार
'लालबागचा राजा'चरणी 12 दिवसांत किती दान; भाविकांकडून सोनं-चांदी अन् भरभरुन रोकडही अर्पण
'लालबागचा राजा'चरणी 12 दिवसांत किती दान; भाविकांकडून सोनं-चांदी अन् भरभरुन रोकडही अर्पण
सुस्साट कारची दुचाकीला पाठीमागून धडक, भीषण अपघातात पती ठार, पत्नी जखमी, स्कुटीचालकाच्या हातालाही फ्रॅक्चर
सुस्साट कारची दुचाकीला पाठीमागून धडक, भीषण अपघातात पती ठार, पत्नी जखमी, स्कुटीचालकाच्या हातालाही फ्रॅक्चर
Tukaram Mundhe : 'आईचे दूध सर्वोत्तम' शिशु आहार उत्पादनांवर लिहिणं बंधनकारक, तुकाराम मुंढेंनी आकडेवारी सादर करत गंभीर वास्तव मांडलं... 
शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात स्तनपानाचं प्रमाण जास्त, शहरी महाराष्ट्रातील स्थिती अत्यंत भयावह : तुकाराम मुंढे
'ईव्हीएम असो वा मतदार यादी, दोन्हींमध्ये फेरफार, ज्ञानेश कुमारांनी निवडणूक फिक्स केली, अलीकडील सर्व निवडणुका बेकायदेशीर..' राहुल गांधींचा हल्लाबोल
'ईव्हीएम असो वा मतदार यादी, दोन्हींमध्ये फेरफार, ज्ञानेश कुमारांनी निवडणूक फिक्स केली, अलीकडील सर्व निवडणुका बेकायदेशीर..' राहुल गांधींचा हल्लाबोल
नाशिकच्या गोदाघाटावर अघोरी स्नान, महिलेच्या डोळ्यात लिंबाचा रस पिळला; लाखो रुपयांची फसवणूक, गुन्हा दाखल
नाशिकच्या गोदाघाटावर अघोरी स्नान, महिलेच्या डोळ्यात लिंबाचा रस पिळला; लाखो रुपयांची फसवणूक, गुन्हा दाखल
Gold : दुबईत सोनं भारतापेक्षा महाग की स्वस्त, दुबईतून किती ग्रॅम सोनं कोणताही कर न देता आणता येतं? 
दुबईत सोनं भारतापेक्षा महाग की स्वस्त, दुबईतून किती ग्रॅम सोनं कोणताही कर न देता आणता येतं? 
Embed widget