एक्स्प्लोर
LIVE : भिवंडी इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा 8 वर

भिवंडी : भिवंडीतील गैबीनगर परिसरात एक दुमजली इमारत पडली आहे. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या इमारतीमध्ये नऊ ते दहा कुटुंबं राहत होती. सकाळपासून सुरु असलेल्या पावसामुळे इमारत खचली होती. त्यानंतर इमारत पडून 30 ते 35 जण अडकल्याची भीती आहे. संबंधित इमारत धोकादायक म्हणून घोषित केली होती. बचाव मोहीम सुरु असून पावसामुळे यात अडथळे येत आहेत. शिवाय गल्ली चिंचोळी असल्यामुळेही बचावकार्यात अडथळे येत आहेत. अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला असून सहा ते सात जण गंभीर जखमी आहेत. जखमींना जवळच्या इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
Before You Go
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र





















