एक्स्प्लोर

नवरीची लग्नमंडपात बुलेटवरुन रॉयल एन्ट्री

प्रणाली विश्वजित केणे (वय २२ वर्ष) असं या नवरीचं नाव असून चैताली विजय खुटले (वय २१ वर्ष) आणि आशिकी किरण पाटील (वय २० पाटील रा. कासार वडवली) अशी करवल्यांची नावं आहेत.

भिवंडी : 'सैराट' चित्रपटातील अभिनेत्री रिंकू राजगुरु अर्थात आर्चीची कॉलेजमध्ये बुलेटवरील एन्ट्री खूपच चर्चेचा विषय ठरली. तेव्हापासून गावखेड्यातील मुलींमध्येही बुलेटचं आकर्षण वाढलं. भिवंडी तालुक्यातील आमणे गावात नवरीने लग्नमंडपात करवल्यांसह बुलटेवरुन एन्ट्री केल्यामुळे नवरदेवासह वऱ्हाडी मंडळी आवक् झाली. प्रणाली विश्वजित केणे (वय २२ वर्ष) असं या नवरीचं नाव असून चैताली विजय खुटले (वय २१ वर्ष) आणि आशिकी किरण पाटील (वय २० पाटील रा. कासार वडवली) अशी करवल्यांची नावं आहेत. प्रणालीला लहानपणापासून दुचाकीची चालवण्याची आवड आहे. तिने बी.कॉमपर्यंतच शिक्षण पूर्ण करुन बँकिंग डिग्री प्राप्त केली आहे. कल्याणमध्ये महाविद्यालयात शिकत असताना ती बुलेटवरुनच जायची. शिवाय हौसेखातर फिरण्यासाठी ती बुलेटवरुनच जात असे. प्रणालीला तिचा भाऊ विशालने रक्षाबंधनची भेट म्हणून बुलेट दिली होती. प्रणालीचं लग्न ठाण्यातील योगेश संदीप भोईरशी होतं. मंगळवारी (8 मे) सायंकाळी लग्न समारंभ धुमधडाक्यात पार पडला. लग्नाची वेळ 6.20 वाजता असल्याने भटजीने मंगलाष्टकांना सुरुवात केली. वऱ्हाडींसह पै-पाहुण्यांच्या नजरा नवरीच्या आगमनाकडे वळल्या. मात्र प्रणालीने पती योगेशसह वऱ्हाडी मंडळींना आश्चर्याचा सुखद धक्का देण्यासाठी बुलेटवरुन एन्ट्री केली. हे दृश्य पाहून सर्वच पाहुणे अवाक् झाले. या नवरीचा बुलेटवरील व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाल्यानंतर ठाणे जिल्ह्यात हा विषय चर्चेचा ठरला आहे. आजच्या तरुणांमध्ये बुलेटचं खूपच आकर्षण आहे. मात्र याबाबतीत मुलीही काही मागे नाहीत, हे नवरीच्या बुलेट एन्ट्रीवरुन दिसून आलं.

महत्त्वाच्या बातम्या

MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
नाशिककरांसाठी पुढचे चार ते पाच तास महत्वाचे, 500 मिलीमीटर पाऊस पडण्याचा इशारा, NDRF च्या टीम तैनात
नाशिककरांसाठी पुढचे चार ते पाच तास महत्वाचे, 500 मिलीमीटर पाऊस पडण्याचा इशारा, NDRF च्या टीम तैनात
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ

व्हिडीओ

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
Embed widget