नवी दिल्ली:  एकनाथ शिंदेच्या बंडानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसेना खासदारांना युतीसाठी ग्रीन सिग्नल दिल्याचा गौप्यस्फोट शिंदे गटाचे गटनेते राहुल शेवाळे यांनी केला आहे.  मला पण युती करायची आहे, मी माझ्या परीने खूप प्रयत्न केला. आता तुम्ही तुमच्या पातळीवर प्रयत्न करा असे उद्धव ठाकरे म्हणाल्याचे शेवाळे यांनी सांगितले.


राहुल शेवाळे म्हणाले, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे हे भाजपसोबत युती करण्यासाठी आग्रही होते.  एकनाथ शिंदेच्या बंडानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसेना खासदारांसोबत मातोश्रीवर बैठक झाली. त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, मला पण युती करायची आहे, मी माझ्या परीने खूप प्रयत्न केला. आता तुम्ही तुमच्या पातळीवर योग्य ते निर्णय घ्या.


जून 2021 मध्ये  उद्धव ठाकरेंची  पंतप्रधान मोदींसोबत एक तास चर्चा झाली.  मात्र त्यानंतर जुलैच्या अधिवेशनात 12 आमदारांचं निलंबन केलं, त्यातून चुकीचा संदेश गेला, एकीकडे उद्धव युतीचं बोलणं करतायत दुसरीकडे निलंबन करतायत यामुळे  भाजप पक्ष श्रेष्ठी नाराज झाले आणि पुढची चर्चा रखडली.  आता तुम्ही युतीसाठी प्रयत्न करा असं उद्धव ठाकरेंनी खासदारांना सांगितल्याचे, शेवाळे म्हणाले. 


आमदार शिंदेसोबत गेले त्यानंतर उद्धव ठाकरेंनी सर्व खासदारांना वर्षावर बोलावलं. तिथे झालेल्या पहिल्या बैठकीत सर्व सेना खासदारांनी आमदारांची भूमिका बरोबर आहे असं सांगत उद्धव ठाकरेंना विनंती केली आपण भाजपसोबत जायला हवं, त्यावेळी उद्धव बोलले की, जर एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवणार असतील तर आमदारांची भूमिका मान्य करायची माझी तयारी आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाल्याचे शेवाळे यांनी सांगितले. 


 महाविकास आघाडीसोबत आहोत, एकत्र राहायला पाहिजे, एकत्र निवडणूक लढवली पाहिजे असं उद्धव बोलले मात्र त्याला सर्व खासदारांनी विरोध केला होता.  भाजपसोबत युती करुन आपण निवडून आलो आहोत त्यामुळे आपण भाजपसोबत राहायला हवं असं खासदारांचं मत होते. 


संबंधित बातम्या :


Shivsena-BJP : उद्धव ठाकरे भाजपसोबत युतीसाठी तयार होते पण...; खासदार राहुल शेवाळे यांचे 10 गौप्यस्फोट


Shivsena BJP : भावना गवळींचा व्हिप सर्व 18 खासदारांना लागू, आमचा पाठिंबा एनडीएच्या उमेदवारालाच: राहुल शेवाळे


Eknath Shinde : शिवसेनेचे 12 खासदार एकनाथ शिंदेंसोबत, दिल्लीत सर्वांसोबत पत्रकार परिषद; गटनेता बदलण्यासाठी ओम बिर्लांना पत्र