एक्स्प्लोर

भाजपला सत्तेची सूज, ठाकरे बंधू एकत्र येऊ नयेत म्हणून त्यांचा प्रयत्न, भास्कर जाधवांचा हल्लाबोल, म्हणाले भाजपला आभास निर्माण करण्याचा रोग

भाजप दोन भाऊ दोन पक्ष एकत्र येणार नाहीत, यासाठी प्रयत्न करत असल्याचे मत शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav ) यांनी केलं.

Bhaskar Jadhav : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray ) हे दोन्ही भाऊ एकत्र येण्यासंदर्भात आम्ही आशावादी आहोत. मात्र, भाजप दोन भाऊ दोन पक्ष एकत्र येणार नाहीत, यासाठी प्रयत्न करत असल्याचे मत शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav ) यांनी केलं.  घराघरात भांडण लावून राजकीय स्वार्थ साधला जाईल याचा विचार भाजप करत असल्याचे जाधव म्हणाले. ते नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले तर महानगरपालिकेच्या निवडणुका 54 टक्के मतं या दोन भावांना मिळतील अशा पद्धतीची सर्वे आहे करतो. त्यामुळे भाजप घाबरलेली आहे असंही भास्कर जाधव म्हणाले.  नागपूर महानगरपालिकेत आमच्या ताकतीचा आम्हाला अंदाज आहे. हवेत गोळीबार करणारा कार्यकर्ता नाही. यापूर्वी आम्हाला योग्य स्थान संधी मिळाली नाही. आमच्या पक्षातील कार्यकर्ते संधीची वाट पाहत आहे..योग्य संधी मिळाली ते करिष्मा करून दाखवतील. आज बैठकीत आढावा घेऊ,  सहा महिन्यापूर्वी सुद्धा 151 जागेचा आढावा घेतला आहे. वस्तुनिष्ठ परिस्थिती समजून घेऊ त्याचा आढावा पुढे देऊ असे जाधव म्हणाले. 

महायुतीला विधानसभेत राक्षसी बहुमत 

महायुतीला विधानसभेत राक्षसी बहुमत मिळालं आहे, तरी ते एकत्र लढत आहेत. त्यामुळं आम्ही आघाडी करुन एकत्र लढलो, तर त्याचा फायदा महा विकास आघाडीला फायदा होईल असे भास्कर जाधव म्हणाले. राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हिंदू धर्मात ही पद्धत आहे की वाढदिवस असल्यावर त्यांना शुभेच्छा दिल्या जातात. राज ठाकरे यांनाही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. काल आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस होता. पण अहमदाबादला जी दुर्घटना झाली त्यामुळं वाढदिवस साजरा केला नाही असे भास्कर जाधव म्हणाले. 

भाजपला सत्तेची सूज, दुसऱ्या पक्षातील नेतृत्व घेऊन आपला पक्ष मोठा केला 

शरद पवार गट भाजपमध्ये जाण्यास इच्छुक असल्याच्या मुद्यावर देखील भास्कर जाधव यांना विचारण्यात आले. यावेळी जाधव म्हणाले की, विरोधी पक्षाच्या आमदार आणि खासदाराबद्दल अफवा पसरवणे आणि भाजपबद्दल लोकांचं प्रेम किती वाढलं असा आभास निर्माण करण्याचा रोग भाजपला लागला आहे. संघाच्या स्थापनेला 100 वर्ष होऊन, त्यांचा विचारधारेवरील नेतृत्व आणि लोकप्रतिनिधी उभे करु शकले नाहीत, हा त्यांचा पराभव आहे याचा विसर विसर पडला असल्याची टीका जाधव यांनी केली. त्यामुळे दुसऱ्या पक्षातील नेतृत्व घेऊन आपला पक्ष मोठा करत आहे. ही सत्तेची आलेली ही सूज आहे .सत्ता गेल्यावर सूज गेल्यावर मात्र वाईट अवस्था होईल अस जाधव म्हणाले. 

संघाच्या मुशीत भाजप नेतृत्व तयार झाल आहे. राजसत्तेवर येणारा पक्ष म्हणून हा भाजप आहे. त्यांच्या संघाचा शाखेच हे अपयश आहे, पर्यायाने भाजपचे हे अपयश आहे. संघ हा नेहमीभाजपच्या बाजूने मैदानात उतरतो. देशात हिंदुत्वाचा प्रचार असो की राम मंदिर बांधायचा असो. सर्व पक्षाकडे जाती धर्माच्या लोकांकडे जायचं. राम मंदिराच्या उभारणीत सगळ्या धर्माच्या लोकांकडून वर्गणी गोळा केली. मुस्लिम धर्मियांकडून सुद्धा वर्गणी गोळा केली. निवडणूक आली की प्रचार मात्र भाजपचा करायचा आहे, ही दुहेरी नीती लोकांच्या लक्षात यायला लागली आहे. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वाभिमानी महाराष्ट्र आहे. पूर्वी महाराष्ट्र हा दोन गुजराती नेत्यांकरिता पाहिजे होता. आता ते तीन झालेले आहे. (अडाणी) पण भाजपचे हे स्वप्न धुळीस मिळाल्याशिवाय राहणार नाही असे जाद म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

Nagpur Violence : सामाजिक तेढ वाढवणाऱ्या नितेश राणेंचा बोलविता धनी कोण? नागपूरच्या दंगलीनंतर भास्कर जाधवांचा सवाल

महत्त्वाच्या बातम्या

पावसाची दांडी, पाण्याअभावी पिकं लागली करपू, बनगरवाडीतील शेतकऱ्यांवर गाव सोडण्याची वेळ, ग्रामविकासमंत्र्यांच्या मतदारसंघात भीषण वास्तव  
पावसाची दांडी, पाण्याअभावी पिकं लागली करपू, बनगरवाडीतील शेतकऱ्यांवर गाव सोडण्याची वेळ, ग्रामविकासमंत्र्यांच्या मतदारसंघात भीषण वास्तव  
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Sugar Price Hike: साखर कारखानदारांकडू इथेनॉल निर्मितीला प्राधान्य, नेपाळसह इतर मार्गाने चोरुन साखर विक्री? साखर दरवाढीचं माजी साखर आयुक्तांनी कारण सांगितलं, म्हणाले...
साखर कारखानदारांकडू इथेनॉल निर्मितीला प्राधान्य, नेपाळसह इतर मार्गाने चोरुन साखर विक्री? साखर दरवाढीचं कारण काय? माजी साखर आयुक्त म्हणाले...

व्हिडीओ

Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
Chhatrapati Sambhajinagar Crime News: बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
Embed widget