Nagpur News : काँग्रेस पक्षाला (Congress Party) नवसंजीवनी देण्यासाठी राहुल गांधी (Rahul Gandhi) भारत जोडो यात्रेद्वारे (Bharat Jodo Yatra) सामान्यांशी संवाद साधत आहे. नुकतेच काँग्रेसची भारत जोडो यात्रा विदर्भातूनही गेली. यानंतर काँग्रेससाठी सकारात्मक वातावरण तयार झाल्याचा दावा करत काँग्रेस पक्षातर्फे 'हात से हात जोडो यात्रा' करण्यात येणार आहे. याच्या नियोजनासाठी नागपुरात (Nagpur) आज प्रदेश काँग्रेस कमिटीने महत्वाची बैठक बोलावली आहे. ज्यात राज्यातही सर्वच मोठे नेते उपस्थित राहणार आहे.
पक्षाला मजबूत करत थेट जनतेच्या दारावर जाण्यासाठी काँग्रेस 'हात से हात जोडो' हे अभियान घेऊन येत आहे . 26 जानेवारी पासून देशभरात याची सुरुवात होणार असून त्या अनुषंगाने आज नागपूरमध्ये प्रदेश काँग्रेस कमिटीने महत्वाची बैठक बोलावली आहे. ज्यात राज्यातही सर्वच मोठे नेते उपस्थित राहणार आहे.
काँग्रेसचे 'हात से हात जोडो' हे अभियान प्रत्येक प्रदेश काँग्रेस कमिटीला राज्य स्तरावर राबवायचे आहे. गाव पातळी, ब्लॉक पातळी पासून तर तालुका व जिल्हा स्तरावर समांतर पद्धतीने स्थानिक नेते व पदाधिकारी याचे आयोजन करतील. हे 'हात से हात जोडो' अभियान राबवणार असून यात प्रभात फेऱ्या, पदयात्रा, बैठका, सभा यांचा समावेश असणार आहे. या माध्यमातून मतदारांच्या दारावर पोहचण्याचा काँग्रेस पक्षाचा उद्देश आहे. मात्र महाराष्ट्रात या अभियानाचे स्वरूप कसे असेल हे गुपित असल्याचे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी सांगितले. काँग्रेस पक्षाचे 'हात से हात जोडो' हे अभियान त्या त्या राज्यात किती यशस्वी होते, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
विदर्भात कॉंग्रेसला 'बुस्ट'
राहुल गांधी यांच्या नेतृत्वात भारत जोडो यात्रा नोव्हेंबर महिन्यात विदर्भात दाखल झाली होती. यात विदर्भातील वाशीम, अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातून प्रवास केला. विदर्भातील नेत्यांनीही वातावरण निर्मितीसाठी प्रयत्न केले होते. तसेच विदर्भातही यात्रेला मिळालेल्या प्रतिसादानंतर निवडणूकीनंतर शांत असलेल्या पक्षाच्या नेत्यांमध्ये ही उर्जा कायम ठेवण्यासाठी पक्षातर्फे 'हात से हात जोडो यात्रा'ची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे देशभरासह विदर्भात या अभियानाला किती प्रतिसाद मिळणार तसेच ही यात्रा विदर्भात कॉंग्रेसमध्ये नव उर्जा संचार करु शकणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ही बातमी देखील वाचा...