एक्स्प्लोर

भंडारा-गोंदिया निकाल : राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे विजयी

भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक निकालाचे सर्व अपडेट्स लाईव्ह

भंडारा : भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपचा पराभव केला. इथं राष्ट्रवादीच्या मधुकर कुकडे यांनी भाजपच्या हेमंत पटले यांचा दारुण पराभव केला. पहिल्या फेरीपासून कुकडे हे आघाडीवर होते. कुकडेंनी 40 हजारांहून अधिक मतांनी पटलेंचा पराभव केला. मतमोजणीला सुरुवात झाल्यापासूनच राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यामध्ये अटीतटीची लढत होती. सुरुवातीपासून राष्ट्रवादीने काही हजार मतांची आघाडी घेतली होती, मात्र सहाव्या फेरीनंतर भाजपला आघाडी मिळाली. अखेर, राष्ट्रवादीला मोठ्या मताधिक्याने विजयी कूच करण्यास यश आलं. भाजप उमेदवाराला मतांतील तफावत मिटवता न आल्यामुळे भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत हेमंत पटले यांचा दारुण पराभव झाला. भंडारा- गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार नाना पटोले यांच्या राजीनाम्यामुळे 28 मे रोजी पोटनिवडणुकीसाठी मतदान झालं होतं.

LIVE UPDATE

सोळावी फेरी मधुकर कुकडे -(राष्ट्रवादी काँग्रेस) - 2,70,471      हेमंत पटले - (भाजप) - 2,43,204 मताधिक्य - 27,267 चौदावी फेरी मधुकर कुकडे -(राष्ट्रवादी काँग्रेस) - 2,26,977      हेमंत पटले - (भाजप) - 2,02,138 मताधिक्य - 24,839 बारावी फेरी मधुकर कुकडे -(राष्ट्रवादी काँग्रेस) - 2,08,883      हेमंत पटले - (भाजप) - 1,88,300 मताधिक्य - 20,583 दहावी फेरी मधुकर कुकडे -(राष्ट्रवादी काँग्रेस) - 1,62,287      हेमंत पटले - (भाजप) - 1,49,935 मताधिक्य - 12,352

LIVE : आठ फेऱ्यांनंतर भाजप उमेदवार हेमंत पटले 3193 मतांनी आघाडीवर, राष्ट्रवादीच्या मधुकर कुकडे यांना पिछाडी

सहावी फेरी

मधुकर कुकडे -(राष्ट्रवादी काँग्रेस) - 1,02,000      हेमंत पटले - (भाजप) - 94,868 मताधिक्य - 7,132

पाचवी फेरी

मधुकर कुकडे -(राष्ट्रवादी काँग्रेस) - 85,160      हेमंत पटले - (भाजप) - 80,131 मताधिक्य - 5,029

LIVE :  चौथ्या फेरीत राष्ट्रवादी 3959 मतांनी पुढे

तिसरी फेरी

मधुकर कुकडे -(राष्ट्रवादी काँग्रेस) - 51219      हेमंत पटले - (भाजप) - 48382 मताधिक्य - 2,837

दुसरी फेरी

मधुकर कुकडे -(राष्ट्रवादी काँग्रेस) - 35512      हेमंत पटले - (भाजप) - 33306 भारिप - 778 इतर - 448 मताधिक्य - 2206

पहिली फेरी

मधुकर कुकडे -(राष्ट्रवादी काँग्रेस) - 18028      हेमंत पटले - (भाजप) - 17246 मताधिक्य - 782 LIVE : तिसऱ्या फेरीमध्ये राष्ट्रवादी 3100 मतांनी पुढे गेल्याची माहिती LIVE : तिसऱ्या फेरीची मतमोजणी पूर्ण, मात्र प्रशासनाकडून कोणत्याही आकडेवारीची घोषणा नाही LIVE : तुमसर वगळता इतर पाचही विधानसभा क्षेत्रांमध्ये भाजपच्या हेमंत पटले यांना आघाडी LIVE : तुमसर विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे पुढे LIVE : पोस्टल मतांमध्ये भाजप पुढे LIVE :  मतमोजणीला सुरुवात, पोस्टल मतांची मोजणी सुरु नाना पटोले यांनी भाजपला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पटोलेंनी 12 डिसेंबर 2017 रोजी दिलेला राजीनामा 14 डिसेंबर 2017 रोजी मंजूर झाल्यावर या मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. गोंदिया-भंडारा पोटनिवडणुकीत मतदानावेळी झालेला अक्षम्य घोळ, त्यानंतर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, फेरमतदान, जिल्हाधिकाऱ्यांची उचलबांगडी यामुळे पोटनिवडणुकीची चुरस कमालीची वाढली आहे. 49 मतदान केंद्रावर फेरमतदान भंडारा-गोंदियात मतदान यंत्रामध्ये बिघाड आणि घोळ झाल्याच्या आरोपानंतर काल (30 मे रोजी ) 49 मतदान केंद्रांवर फेरमतदान घेण्यात आलं. यात भंडारा विधानसभा मतदारसंघातील 14 केंद्रांवर, साकोली मतदारसंघातील 4 केंद्रांवर, अर्जुनी मोरगावमधील 2, तिरोडातील 8 आणि गोंदियातील 21 मतदान केंद्रांवर फेरमतदान झालं. 28 मे रोजी भंडारा-गोंदियासाठी मतदान झालं, तेव्हा अनेक ठिकाणी मतदान यंत्रांमध्ये बिघाड होत असल्याचं लक्षात आलं. तसंच काही ठिकाणी मतदान उशीरा सुरु झालं. ज्यामुळे सगळी प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात अडकली होती. त्याची तक्रारही काँग्रेसनं थेट निवडणूक आयोगाकडे केली. दरम्यान मतदानावेळी झालेल्या घोळामुळे जिल्हाधिकारी अभिमन्यू काळेंची तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यांच्याजागी कादंबरी बलकवडेंची नेमणूक कऱण्यात आली. 2014 च्या लोकसभा निवडणुकीचा इतिहास तत्कालीन भाजप खासदार नाना पटोले यांनी राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेल यांना जवळपास दीड लाख मतांनी हरवलं होतं. तिसऱ्या स्थानावर बसप होतं. रिंगणातील उमेदवार राष्ट्रवादी आणि काँग्रेस या ठिकाणी एकत्र लढत असून राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे हे उमेदवार आहेत. तर भाजपकडून हेमंत पटले मैदानात आहेत. भाजपचे हेमंत पटले हे माजी आमदार आहेत, तर राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे हे तीन वेळा आमदार राहिले आहेत. एकूण 18 उमेदवार रिंगणात असले तरी मुख्य लढत भाजप आणि राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीमध्ये आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी आघाडी केली असली, तरी ही जागा काँग्रेसला जाईल आणि नाना पटोले उभे राहतील, अशी धारणा होती. मात्र राष्ट्रवादीने जागा सोडली नाही आणि प्रफुल्ल पटेल स्वतःही उभे राहिले नाहीत. मात्र दोघांनी अत्यंत जुनं वैर मिटवलं. दोघांनीही राष्ट्रवादीच्या मधुकर कुकडे यांच्यासाठी प्रचार केला. राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, अजित पवार, धनंजय मुंडे येऊन गेले, तर भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भरपूर जोर लावला आहे. भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात सात विधानसभा क्षेत्र असून त्यापैकी सहा भाजप, तर एक काँग्रेसकडे आहे.

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! पशुधनाचा मृत्यू झाल्यास मिळणार आर्थिक मदत, काय आहेत निकष? कोणत्या जनावरांसाठी किती मदत?
मोठी बातमी! पशुधनाचा मृत्यू झाल्यास मिळणार आर्थिक मदत, काय आहेत निकष? कोणत्या जनावरांसाठी किती मदत?
Eknath Shinde : मनोज जरांगे म्हणाले, गद्दारीचा शिक्का पुसणार होतो; एकनाथ शिंदेंचे जरांगेंना एका वाक्यात उत्तर, म्हणाले....
मनोज जरांगे म्हणाले, गद्दारीचा शिक्का पुसणार होतो; एकनाथ शिंदेंचे जरांगेंना एका वाक्यात उत्तर, म्हणाले....
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑगसस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑगसस्ट 2026 | गुरुवार
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
Embed widget