एक्स्प्लोर

'जय महाराष्ट्र' लिहिलेल्या एसटी चालक, कंडक्टरवर राजद्रोहाचा गुन्हा

बेळगाव : 'जय महाराष्ट्र' लिहिलेली पहिली बस बेळगावात आल्यावर 'जय महाराष्ट्र' म्हणून घोषणा दिल्याप्रकरणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांसह एसटीचे ड्रायव्हर,कंडक्टर यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे. मदन बामणे, अमर यळ्ळूरकर, गणेश दड्डीकर, सुरज कणबरकर यांच्यासह अन्य बारा जणांवर राजद्रोहाचा गुन्हा मार्केट पोलिसांनी दाखल केला आहे. 143, 147 आणि 153 अ कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, ‘जय महाराष्ट्र’ लिहिलेली महाराष्ट्र परिवहन महामंडळाची पहिली एसटी बेळगावात दाखल झाली. त्यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी बसचं जंगी स्वागत केलं. तसंच बसचे ड्रायव्हर आणि कंडक्टर यांना पुष्पगुच्छ आणि भगवा फेटा घालून स्वागत केलं. कर्नाटकचे नगरविकास मंत्री रोशन बेग यांनी कर्नाटकात ‘जय महाराष्ट्र’ म्हटल्यास लोकप्रतिनिधींचं पद रद्द करण्याचा कायदा करण्याची धमकी दिली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून महाराष्ट्राचे परिवाहन मंत्री दिवाकर रावते यांनी महाराष्ट्राच्या प्रत्येक एसटी बसवर जय महाराष्ट्रात लिहिण्यात येईल, अशी घोषणा केली होती. त्याप्रमाणे शुक्रवारी सकाळी मुंबईहून निघालेली मुंबई-बेळगाव बस रात्रीसाडे नऊच्या दरम्यान बेळगाव स्थानकावर पोहोचली. यानंतर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी ड्रायव्हर, कंडक्टरला फेटा बांधून प्रवाशांना पेढे वाटले आणि जय महाराष्ट्रच्या घोषणा दिल्या. त्यानंतर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यासह एसटी चालक, कंडक्टर यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. संबंधित बातम्या 'जय महाराष्ट्र' लिहिलेल्या एसटीचं बेळगावात जल्लोषात स्वागत दिवाकर रावतेंनी ‘करुन दाखवलं’, एसटीवर ‘जय महाराष्ट्र’ आता राज्यातील प्रत्येक एसटीवर ‘जय महाराष्ट्र’ची पाटी ‘जय महाराष्ट्र’च्या फतव्याविरोधात मोर्चा, शिवसेना मंत्र्यांना कोल्हापुरातच रोखलं! कर्नाटक मंत्र्याविरोधात बेळगावात मराठीजनांचा मोर्चा अरेरावीची भाषा खपवून घेणार नाही, चंद्रकांत पाटलांचा रोशन बेगना सज्जड दम शिवसेना आक्रमक, कर्नाटकच्या बसवर ‘जय महाराष्ट्र’चे स्टिकर्स ‘जय महाराष्ट्र’ बोलल्यास पद रद्द, बेळगावात मराठी लोकप्रतिनिधींची गळचेपी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ahmednagar Lok Sabha : अहमदनगरमध्ये पैसे वाटल्याचा आरोप, सुजय विखेंचे निलेश लंके अन् रोहित पवारांना जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले...
अहमदनगरमध्ये पैसे वाटल्याचा आरोप, सुजय विखेंचे निलेश लंके अन् रोहित पवारांना जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले...
Heeramandi Actress : 30-40 टेकनंतरही परफेक्ट सीन येत नव्हता; अभिनेत्रीने उचलला दारूचा ग्लास; मग असं काही झालं की डायरेक्टर बोलला लय भारी
30-40 टेकनंतरही परफेक्ट सीन येत नव्हता; अभिनेत्रीने उचलला दारूचा ग्लास; मग असं काही झालं की डायरेक्टर बोलला लय भारी
निर्यातबंदी उठवून फायदा काय? 10 दिवस झाले तर कांद्याच्या दरात वाढ नाहीच, शेतकऱ्यांचं म्हणणं काय?
निर्यातबंदी उठवून फायदा काय? 10 दिवस झाले तर कांद्याच्या दरात वाढ नाहीच, शेतकऱ्यांचं म्हणणं काय?
Kim Jong Un : किम जोंग उनचा भव्य राजमहाल उद्ध्वस्त, उत्तर कोरियामध्ये मोठ्या घडामोडी
किम जोंग उनचा भव्य राजमहाल उद्ध्वस्त, उत्तर कोरियामध्ये मोठ्या घडामोडी
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Saleel Kulkarni : सुप्रसिद्ध गायक, संगीतकार सलील कुलकर्णींनं लेकासोबत बजावला मतदानाचा हक्क : ABP MajhaBeed Loksabha Pankaja Munde : बाबांची उर्जा आणि आशीर्वाद माझ्यासोबत आहे : पंकजा मुंडेParli Lok Sabha Dhananjay Munde : छोट्या बहिणीला मतदान करताना जो आनंद झालाय तो शब्दात मांडण अशक्यUddhav Thackeray Lok Sabha :   निवडणूक महाभारतासारखी, लोकशाहीचं वस्त्रहरण होतंय : उद्धव ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ahmednagar Lok Sabha : अहमदनगरमध्ये पैसे वाटल्याचा आरोप, सुजय विखेंचे निलेश लंके अन् रोहित पवारांना जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले...
अहमदनगरमध्ये पैसे वाटल्याचा आरोप, सुजय विखेंचे निलेश लंके अन् रोहित पवारांना जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले...
Heeramandi Actress : 30-40 टेकनंतरही परफेक्ट सीन येत नव्हता; अभिनेत्रीने उचलला दारूचा ग्लास; मग असं काही झालं की डायरेक्टर बोलला लय भारी
30-40 टेकनंतरही परफेक्ट सीन येत नव्हता; अभिनेत्रीने उचलला दारूचा ग्लास; मग असं काही झालं की डायरेक्टर बोलला लय भारी
निर्यातबंदी उठवून फायदा काय? 10 दिवस झाले तर कांद्याच्या दरात वाढ नाहीच, शेतकऱ्यांचं म्हणणं काय?
निर्यातबंदी उठवून फायदा काय? 10 दिवस झाले तर कांद्याच्या दरात वाढ नाहीच, शेतकऱ्यांचं म्हणणं काय?
Kim Jong Un : किम जोंग उनचा भव्य राजमहाल उद्ध्वस्त, उत्तर कोरियामध्ये मोठ्या घडामोडी
किम जोंग उनचा भव्य राजमहाल उद्ध्वस्त, उत्तर कोरियामध्ये मोठ्या घडामोडी
स्वत:च लाटली गोल चपाती, लंगरसेवाही दिली; डोक्यावर पगडी, मोदींनी गुरुद्वारात टेकला माथा
स्वत:च लाटली गोल चपाती, लंगरसेवाही दिली; डोक्यावर पगडी, मोदींनी गुरुद्वारात टेकला माथा
Savani Ravindra : मतदान केंद्रावर गेली पण शाई न लावताच परतली; गायिकेने सांगितला अनुभव, नेमकं काय घडलं?
मतदान केंद्रावर गेली पण शाई न लावताच परतली; गायिकेने सांगितला अनुभव, नेमकं काय घडलं?
CBSE बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर, 87.90 टक्के विद्यार्थी पास; येथे पाहा निकाल
CBSE बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर, 87.90 टक्के विद्यार्थी पास; येथे पाहा निकाल
Pravin Tarde : बोटाला शाई लावण्याअगोदर प्रवीण तरडेंचा पुणेकरांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
बोटाला शाई लावण्याअगोदर प्रवीण तरडेंचा पुणेकरांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
Embed widget