एक्स्प्लोर

बेळगावसह सीमा भागात आज काळा दिवस, मुंबईतही निषेध

बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी, संतपूरसह संयुक्त महाराष्ट्र करण्यासाठी अनेक लढे झाले, अनेकांनी प्राण गमावले. याच्या निषेधार्थ 1 नोव्हेंबर रोजी बेळगावमध्ये काळा दिवस पाळण्यात येतो.

बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी बांधव कर्नाटक राज्याच्या स्थापनेचा दिवस म्हणजेच 1 नोव्हेंबर हा काळा दिवस म्हणून पाळतात. कोल्हापूर आणि  बेळगाव जिल्ह्यातील सीमाभागात आज मराठी बांधव बंद पाळून कर्नाटक सरकारच्या जुलमी राजवटीचा निषेध नोंदवतात. संयुक्त महाराष्ट्र चळवळीपासून सुरु झालेला हा काळा दिवस गेली 63 वर्षे पाळला जात आहे. बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, या घोषणांनी बेळगाव परिसर आज दणाणून गेला. बेळगावमध्ये मोर्चा आणि निषेध रॅली काढून काळा दिवस पाळला जात आहे. बेळगावमधील संभाजी महाराज उद्यानातून मूक मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चामध्ये महिलांबरोबरच लहान मुलं आणि तरुणांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला. यावेळी मराठी बांधवांनी केंद्र सरकारबरोबरच महाराष्ट्र सरकारवरही नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्र सरकारने नाक दाबलं की केंद्र सरकार तोंड उघडते. त्यामुळे 370 प्रमाणे हा प्रश्न देखील सोडवावा, अशी मागणी त्यांनी केली. सीमावासियांचा मुंबईत निषेध सीमा भागातून मुंबईत स्थाईक झालेले नागरिकही आजच्या दिवशी आपल्या राहत्या ठिकाणी 1 नोव्हेंबर हा काळा दिवस म्हणून पाळतात. मुंबईतील डिलाई रोड परिसरात आज सकाळपासून नागरिकांनी हाताला काळी रिबीन बांधून आणि काळे झेंडे घेऊन कर्नाटक सरकारचा निषेध नोंदवत जोरदार घोषणाबाजी केली. अनेक लढे झाले, अनेकांनी प्राण गमावले, परंतु प्रश्न अजूनही प्रलंबित 1 नोव्हेंबर 1956 रोजी स्वतंत्र भारतात भाषावर प्रांतरचना झाली, त्याच दिवशी बेळगावसह 40 लाख मराठी  माणसं कर्नाटक राज्यात विभागली गेली. बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी, संतपूरसह संयुक्त महाराष्ट्र करण्यासाठी अनेक लढे झाले, अनेकांनी प्राण गमावले. परंतु हा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे. याच्या निषेधार्थ 1 नोव्हेंबर रोजी बेळगावमध्ये काळा दिवस पाळण्यात येतो. या निमित्ताने हजारो सीमावासिय एकत्र येऊन निषेध व्यक्त करतात.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: मुंबईत सलग चौथ्या दिवशीही पावसाचा जोर कायम, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी आणि पालघरमध्ये शाळांना सुट्टी
Maharashtra Live blog updates: मुंबईत सलग चौथ्या दिवशीही पावसाचा जोर कायम, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी आणि पालघरमध्ये शाळांना सुट्टी
Devendra Fadnavis on Missing Link Potholes: नव्याकोऱ्या मिसिंग लिंकवर खड्डे कसे पडले, देवेंद्र फडणवीसांनी उलगडून सांगितलं इंजिनिअरिंग टेक्निक, म्हणाले, 'पहिल्या पावसानंतर दुसरी लेयर येते'
नव्याकोऱ्या मिसिंग लिंकवर खड्डे कसे पडले, देवेंद्र फडणवीसांनी उलगडून सांगितलं इंजिनिअरिंग टेक्निक, म्हणाले, 'पहिल्या पावसानंतर दुसरी लेयर येते'
Pune Crime News: प्रेमविवाहानंतर बारामतीहून पुण्यात स्थायिक झाले, पतीचं ऑफिसमधील मुलीवर प्रेम जडलं अन्...; विवाहितेने संपवलं जीवन
प्रेमविवाहानंतर बारामतीहून पुण्यात स्थायिक झाले, पतीचं ऑफिसमधील मुलीवर प्रेम जडलं अन्...; विवाहितेने संपवलं जीवन
Sanjay Raut on Ameet Satam: मुलाच्या मृत्यूवर अमित साटम फिदीफिदी हसल्याचा आरोप, संजय राऊत संतापून म्हणाले, 'तुमच्या अंत्ययात्रेला लोकं भाड्याने बोलवावी लागतील'
मुलाच्या मृत्यूवर अमित साटम फिदीफिदी हसल्याचा आरोप, संजय राऊत संतापून म्हणाले, 'तुमच्या अंत्ययात्रेला लोकं भाड्याने बोलवावी लागतील'

व्हिडीओ

Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ketan Agrawal Case : केतन, सिया अन् चेतनांतर आता लोहगड प्रकरणात 'चौथ्याची' एन्ट्री; कोण आहे तो मिस्ट्री मॅन? काय आहे त्याचा रोल?
केतन, सिया अन् चेतनांतर आता लोहगड प्रकरणात 'चौथ्याची' एन्ट्री; कोण आहे तो मिस्ट्री मॅन? काय आहे त्याचा रोल?
Bhimashankar Temple : स्वर्गीय अनुभव! धुक्याच्या ढगात हरवले भीमाशंकर मंदिर; वीकेंडला निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी, पाहा Photos
स्वर्गीय अनुभव! धुक्याच्या ढगात हरवले भीमाशंकर मंदिर; वीकेंडला निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी, पाहा Photos
Jalna Bus Accident News : भीषण अपघात! जालना-बीड महामार्गावर एसटी महामंडळाच्या दोन बसची समोरासमोर धडक; चालकांसह 30 ते 40 विद्यार्थी अन् प्रवासी जखमी
भीषण अपघात! जालना-बीड महामार्गावर एसटी महामंडळाच्या दोन बसची समोरासमोर धडक; चालकांसह 30 ते 40 विद्यार्थी अन् प्रवासी जखमी
Raigad Rain Rice Farming: चिंब पावसानं रान झालं आबादानी! रायगडमध्ये मुसळधार पाऊस, शेतात भात लावणीच्या कामाला वेग
चिंब पावसानं रान झालं आबादानी! रायगडमध्ये मुसळधार पाऊस, शेतात भात लावणीच्या कामाला वेग
Devendra Fadnavis on Mumbai Rain: मुंबई, ठाणे, कोकणात 6 जूनपर्यंत मुसळधार पाऊस, वादळं अन् अतिवृष्टीचा इशारा; देवेंद्र फडणवीसांनी काय सांगितलं?
मुंबई, ठाणे, कोकणात 6 जूनपर्यंत मुसळधार पाऊस, वादळं अन् अतिवृष्टीचा इशारा; देवेंद्र फडणवीसांनी काय सांगितलं?
Mumbai Rain Updates: मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा, हवामान खात्याकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा, विकेंडला रेड अलर्ट
मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा, हवामान खात्याकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा, विकेंडला रेड अलर्ट
Mumbai Rain Updates: मुंबईकरांनो सावधान! पावसाचा जोर आणखी वाढणार; यलो मेट्रो बंद पडली, विरारमध्ये धडकी भरवणारी दृश्यं
मुंबईकरांनो सावधान! पावसाचा जोर आणखी वाढणार; यलो मेट्रो बंद पडली, विरारमध्ये धडकी भरवणारी दृश्यं
Maharashtra Live blog updates: मुंबईत सलग चौथ्या दिवशीही पावसाचा जोर कायम, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी आणि पालघरमध्ये शाळांना सुट्टी
Maharashtra Live blog updates: मुंबईत सलग चौथ्या दिवशीही पावसाचा जोर कायम, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी आणि पालघरमध्ये शाळांना सुट्टी
Embed widget