एक्स्प्लोर

बेळगावात स्मशानात पार पडला आंतरजातीय विवाह!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून अंधश्रद्धा निर्मूलनाच्या उपक्रमाअंतर्गत स्मशानात आंतरजातीय विवाह पार पडला.

बेळगाव : अंत्यसंस्काराला स्मशानात लोक जमले होते, मृतदेह चितेवर ठेवून त्याला अग्नी देण्यात आला तर दुसरीकडे विवाहाची मंगलाष्टके सुरु होती. कोणत्या चित्रपटातील अथवा कोणत्या वाहिनीवरील मालिकेतील हा प्रसंग नव्हे तर बेळगावच्या सदाशिवनगर येथील स्मशानभूमीत एका ठिकाणी अंत्यसंस्कार सुरु होता  तर दुसरीकडे विवाह सोहळा संपन्न होत होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून अंधश्रद्धा निर्मूलनाच्या उपक्रमाअंतर्गत स्मशानात आंतरजातीय विवाह पार पडला. मानव बंधुत्व संघटनेच्या माध्यमातून अंधश्रद्धा दूर करण्यासाठी म्हणून आमदार सतीश जारकिहोळी यांच्या आणि मानव बंधुत्व संघटना यांच्या पुढाकाराने चक्क स्मशानात एक आंतरजातीय विवाह पार पडला. विवाहाला स्वामीजींनी देखील उपस्थिती दर्शवली होती. सोपान बाळकृष्ण जांबोटी,रा.तीर्थकुंडये या अनुसूचित जातीमधील युवकाचा हिरेबागेवाडी येथील रेखा चंद्रप्पा गुरवण्णवर या लिंगायत तरुणीशी आंतरजातीय विवाह स्मशानात पार पडला. आमदार सतीश जारकिहोळी यांनी नवदाम्पत्याला पन्नास हजार रुपये रोख आहेर दिला आणि त्यांचे अभिनंदन केले. आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना सरकारने तीन लाख रुपये मदत द्यावी अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे आमदार सतीश जारकिहोळी यांनी सांगितले. विवाहाला उपस्थित मंडळींनी अक्षता टाकून वधूवरांना शुभेच्छा दिल्या. यापूर्वी देखील आमदार सतीश जारकिहोळी यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त स्मशानात वास्तव्य करुन उपाहार आणि भोजनही केले होते. आज झालेला स्मशानभूमीतील आंतरजातीय विवाह मात्र चर्चेचा विषय झाला आहे. माणसाचा अखेरचा प्रवास जेथे संपतो तेथेच नवजीवनाचा प्रारंभ करण्याचे धाडस दाखवणाऱ्या वधूवरांचे देखील कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray Shivsena UBT Dasara Melava 2026: ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण मुंबई महानगरपालिकेने 24 अटी घातल्या, कोणकोणत्या अटींचं पालन करावे लागणार?
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण BMC ने घातल्या 24 अटी!
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर गाव दत्तक अभियान, मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतलं अंतरवली सराटी गाव दत्तक 
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर गाव दत्तक अभियान, मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतलं अंतरवली सराटी गाव दत्तक 
राज्यात दुष्काळी परिस्थिती, बळीराजासाठी IAS आणि  IPS अधिकाऱ्यांचा पुढाकार, एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला
राज्यात दुष्काळी परिस्थिती, बळीराजासाठी IAS आणि  IPS अधिकाऱ्यांचा पुढाकार, एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला
'जशी आम्ही अंगणवाडी सेविकांना भाऊबीज द्यायचो, तशीच ही दुष्काळी मदत दिवाळीसाठी; पंकजा मुंडे टीकाकारांना म्हणाल्या..
'जशी आम्ही अंगणवाडी सेविकांना भाऊबीज द्यायचो, तशीच ही दुष्काळी मदत दिवाळीसाठी; पंकजा मुंडे टीकाकारांना म्हणाल्या..

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pratapgad Fort : छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
Raigad Crime Controversy : रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
Team India Squad: बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
YCM Hospital : कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन; विभागीय चौकशीचे आदेश
कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन
CJP Tiranga March: सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भारताविरोधात मोठा कट,बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भाजपच्या बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
MPSC New Chairman : मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, विवेक भीमनवार रजेवर जाताच निर्णय
मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, भीमनवार रजेवर जाताच निर्णय
Embed widget