बीड: सारंगपुरा जवळील 25 एकर वक्फ बोर्डाची जमीन बनावट कागदपत्र बनवून खाजगी लोकांच्या नावावर केल्याप्रकरणी बीडमध्ये तत्कालीन उपजिल्हाधिकारी एन. आर. शेळके यांच्यासह मंडळ अधिकारी पी के राख आणि आठ जणांविरुद्ध  गुन्ह नोंदवण्यात आला आहे .जिल्हा वक्फ अधिकारी बीड अमीनजुमम्मा सय्यद  यांच्या तक्रारीवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .


जिल्हा वक्फ अधिकारी यांनी काय म्हटले आहे तक्रारीत?
बीड येथील सारंगपुरा मशिदीची सर्वे नंबर 128 मधील 25 एकर 38 गुंठे वक्फ जमीन  महसूल कर्मचारी अधिकारी व भूमाफियांच्या संगनमताने खाजगी लोकांच्या  नावावर करण्यात आली. सारंगपुरा मशिदीची नोंद  महाराष्ट्र शासन राजपत्रात आहे. असे असताना वक्फ बोर्डाची मालकी काढून  ही जमीन इनामदार रोशन आली पिता मूनव्वर आली यांनी  29/06/1987 2725/99 अन्वये दिनकर ज्ञानोबा गिराम यांना 99 वर्षांच्या लिजवर दिली होती. 


यामध्ये  बेकायदेशीर फेरफार रद्द करून वक्फ बोर्डाचा मालकी लावून ताबा घेण्यासाठी अनेकदा अर्ज करण्यात आले. तरीदेखील वक्फ बोर्डास ताबा मिळालेला नसून उलट सदर  जमीन बेकायदेशीरपणे खालसा  करण्यात आलेली आहे.  सदर सरंगपूरा मस्जिद जमिनीवर वक्फ बोर्डाची मालकी ईनाम जमिनीवर लावण्याऐवजी महसूल अधिकारी कर्मचारी यांनी  संगनमत करून  अशोक पिंगळे, श्रीमंत बापू मस्के, सर्जेराव पांडुरंग हाडूळ, उद्धव तुळशीराम धपाटे व  सदर जमीन बेकायदेशीर पणे  खालसा करणारे त्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करून त्या आधारे आदेश देणारे तत्कालीन  उपजिल्हा अधिकारी एन आर शेळके यांचेसह मंडळ अधिकारी पी के राख यांच्यासह आठ जणांविरुद्ध बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्ह नोंदवला आहे.


चिंचपूरच्या प्रकरणात 15 जणांवर गुन्हा दाखल
काही दिवसांपूर्वी आष्टी तालुक्यातील एकूण सहा धार्मिक स्थळावरच्या जमिनीची बेकायदेशीर विक्री झाल्याचे यापूर्वीच पुढे आले होते. यातच चिंचपूर येथील मदरसाच्या 59 एकरच्या घोटाळ्यात जवळपास 15 जणांवर गुन्हा दाखल झाला. यात इरशान नवाब खान, अस्लम नवाब खान (रा.आष्टी), रहेमान उर्फ रहिम हुसेन शेख, रज्जाक हुसेन शेख, बाहदुरखा अब्बासखा पठाण, शेरखा अब्बास खा पठाण,(सर्व रा.चिंचपूर), एकबाल अहमद खा, आयुब खा अहमद खा पठाण, रूकसाना सय्यद सुलतान, (सर्व रा.तपनेश्वर गल्ली जामखेड), जाकीर बहादूर पठाण, जमीर बहादूर खा पठाण, अस्लम शेरखा पठाण, परवीन जमीर खा पठाण (रा.सर्व चिंचपूर), प्रकाश आघाव पाटील रा.बीड व एन.आर.शेळके रा.बीड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


बीड जिल्ह्यातील धार्मिक स्थळाच्या जमिनींची विक्री करण्याच्या गोरख व्यवसायास निलंबित उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव पाटील यांनी मोठा मोठा हातभार लावला होता.त्याच्या सोबतच एन आर शेळके यांनी बेकायदेशीर जमीन विक्री करण्यास संदर्भामध्ये या आरोपींना सहकार्य केले होते. आता याच बेकायदेशीर जमीन विक्री प्रकरणात आता नायब तहसिलदार पांडूळे व मंडळ अधिकारी सिंघनवाड यांनाही अटक करण्यात आली आहे. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha