बीड : बहुप्रतीक्षित नगर-बीड-परळी रेल्वे मार्गावर अखेर रेल्वे धावलीय. नगर ते आष्टी या 60 किलोमीटर अंतराचे काम पूर्ण झाले असून नगरहून सोलापूर वाडी आणि तिथून आष्टीपर्यंत रेल्वे धावलीय. आज दुपारी आष्टी ते नगर या रेल्वे मार्गावर हायस्पीड रेल्वेची चाचणी होणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात आष्टी ते नगर रेल्वे प्रवास शक्य होणार आहे. त्यामुळे बीडवासियांचं अनेक वर्षांचं स्वप्न साकार झालंय.
आष्टी ते नगर रेल्वे मार्ग आता वाहतुकीसाठी तयार झाला आहे. म्हणूनच या मार्गावर हायस्पीड रेल्वेची चाचणी घेण्यात येत आहे काही दिवसात आष्टी ते नगर रेल्वे प्रवास करणे शक्य होणार आहे. दरम्यान बहुप्रतीक्षित नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाच्या चाचणीनंतर खासदार प्रितम मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तुमचं आणि आपल्या संपूर्ण बीड जिल्ह्याच स्वप्न पूर्ण होण्याच्या दृष्टीने एक मोठ पाऊल आज पडल आहे बाबा, आपल्या रेल्वेचं स्वागत करण्यासाठी आष्टीला निघाले आहे, आशिर्वाद द्या हे स्वप्न लवकरच पूर्ण व्हावे! असे खासदार प्रितम मुंडे यांनी ट्वीट केले आहे.
देवेंद्र फडणवीसांनी देखील ट्वीट करत पंतप्रधानांचे आभार मानले आहे. गोपीनाथजी मुंडे साहेब यांचे स्वप्न पूर्ण होत आहे ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. पंकजा मुंडे, प्रितम मुंडे तुम्ही केलेल्या पाठपुराव्याबद्दल अभिनंदन तसेच पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांचे देखील आभार
निधीअभावी किंवा राजकीय इच्छाशक्तीअभावी या रेल्वेचे काम अनेक वर्षापासून रखडले होते. मागील सात वर्षांपूर्वी बीड रेल्वेसाठी भरघोष असा निधी उपलब्ध करून आला. शिवाय राज्याने देखील अर्धा वाटा उचलला. या कामासाठी माजी ग्रामविकास मंत्री तथा बीडच्या माजी पालकमंत्री पंकजा मुंडे व खासदार प्रीतम मुंडे यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला,त्यामुळे सर्व काही शक्य झाले असल्याच्या भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- जळगाव: एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्या वाहनावर अज्ञातांचा हल्ला
- Welcome to India! Intel भारतात करणार सेमीकंडक्टर निर्मिती