नागपूर : वाढत्या कोरोना (Corona) आणि ओमायक्रॉन रुग्णांच्या पार्श्वभूमीवर नागपुरात (Nagpur ) 31 डिसेंबरला होणाऱ्या पार्ट्यांवर बंदी घालण्यात आली आहे. नागपूर जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. प्रशासनाने त्याबाबतची नियमावली जाहीर केली आहे. 


गेल्या दोन वर्षांपासून धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाचे सावट थोडे कमी होत आहे. असे असतानाच आता परत कोरोनाच्या नव्या व्हेरियंट ओमायक्रॉनने (Omicron) डोके वर काढले आहे. देशभरात ओमायक्रॉनचे रूग्ण वाढत आहेत. शिवाय कमी होत असलेल्या कोरोना रूग्णांच्याही संखेत वाढ होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारसह सर्वच राज्यांनी खबरदारी घेतली आहे. यातच नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांबर निर्बंध घातली आहे. नागरपुरातही 31 डिसेंबरला होणाऱ्या पार्ट्यांवर बंदी घातली आहे. नागपूर जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतल आहे. 


मुंबईतही निर्बंध
राजधानी मुंबईही नव्या वर्षाच्या निमित्ताने होणाऱ्या पार्ट्यांवर निर्बंध घातले आहेत. मुंबईत गर्दीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून विशेष दक्षता बाळगली जाणार आहे. मोकळ्या जागी होणाऱ्या पार्ट्यांना 25 टक्के पेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही. शिवाय घरातच मित्रमंडळींना बोलवून 31 डिसेंबरचे सिलिब्रेशन करणार असाल तर घराच्या एकूण क्षमतेपेक्षा 50 टक्के क्षमतेने पाहुण्यांना तुम्हाला बोलायचं आहे. 


असे आहेत मुंबईकरांसाठी नियम
 1) लग्न व इतर समारंभांमध्ये उपस्थितीची मर्यादा काटेकोरपणे पाळावी. 
2) बंदिस्त जागेत क्षमतेच्या 50 टक्केच उपस्थिती.
3) खुल्या जागेत क्षमतेच्या 25 टक्केच उपस्थितीला परवानगी, मात्र एक हजारांपेक्षा अधिक उपस्थिती नियोजित असेल तर स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची पूर्व परवानगी आवश्यक आहे. 
4) हॉटेल्स, उपहारगृह, सिनेमागृह, मॉल्स आदी ठिकाणी नियमांचे योग्य पालन करावे
5) नाताळ, नववर्ष स्वागताचे समारंभ आयोजन टाळावे
6 )मास्कचा वापर करावा, कोविड लसीकरण पूर्ण करुन घ्यावे


दिल्लीतही निर्बंध
 देशाची राजधानी दिल्लीतही न्यू ईयर पार्टी व अन्य सर्वच कार्यक्रमांवर निर्बंध घातले आहेत. दिल्ली आपत्ती व्यवस्थापन विभागाने याबाबतचा आदेश जारी केला आहे.  


दिल्लीत ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. केंद्र सरकारने सर्वच राज्यांना मंगळवारी पत्र पाठवून सतर्क केलं आहे. यात आवश्यकतेनुसार निर्बंध लावण्याची सूचना केली आहे. त्या पार्श्वभूमीवर डीडीएमएने दिल्लीत गर्दी होईल अशा सर्व प्रकारच्या कार्यक्रमांना मनाई केली आहे. डीडीएमएच्या आदेशानुसार दिल्लीत सर्व सामाजिक, राजकीय, स्पोर्ट्स, मनोरंजन, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांना प्रतिबंध करण्यात आला आहे. 


महत्वाच्या बातम्या