एक्स्प्लोर

'तो' वाद वेगळा, सारिका सोनवणेंवर हल्ला नाही, बीड पोलिसांची माहिती

आरोपी गणेश कदम याने दारूच्या नशेत आणि वैयक्तिक वादातून केलेले कृत्य आहे. घडलेली घटना ही सभेच्या ठिकाणापासून किमान शंभर ते दीडशे फूट अंतरावर आहे.

बीड : राष्ट्रवादीचे बीडचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या पत्नी सारिका सोनवणे यांच्यावर हल्ला झाल्याच्या अफवा पसरवल्या असल्याचे बीड पोलिसांनी सांगितले आहे. बजरंग सोनवणे यांच्या पत्नी सारिका सोनवणे यांच्या कॉर्नर बैठकीशेजारी हा प्रकार घडला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. वैजनाथ सोळंके आणि गणेश कदम यांच्यातील आपापसातील वादातून गणेश कदमने वैजनाथ सोळंकेंवर हल्ला केला. याप्रकरणी धर्माळा, ता. धारुर येथील वैजनाथ सोळंके यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, आज सायंकाळी 7.30 वाजताच्या सुमारास ते घरासमोर थांबले असताना गणेश कदम हा मद्यधुंद अवस्थेत कोयता घेऊन त्यांच्या घरासमोर आला आणि गोंधळ घालू लागला. वैजनाथ यांनी त्याला अडविण्याचा प्रयत्न केला असता गणेशने कोयत्याने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात वैजनाथ यांच्या बोटाला किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांनतर गणेशने वैजनाथ यांची आणि आणखी एक अशा दोन दुचाकी फोडल्या. यावेळी वैजनाथ यांचे वडील आणि शेजाऱ्यांनी मध्यस्थी करत भांडण सोडविले. याप्रकरणी वैजनाथ सोळंके यांच्या फिर्यादीवरून गणेश कदम याच्याविरोधात पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. वैजनाथ सोळंके आणि गणेश कदम हे एकमेकांचे जवळचे नातेवाईक असल्याचे समजते. दरम्यान, सारिका सोनवणे यांनी सुखरूप असल्याबाबत फेसबुक पोस्ट केली आहे. मी सुखरूप आहे. या कठीण प्रसंगी माझ्या आणि आपले उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या पाठीशी असलेल्या बीड जिल्ह्यातील तसेच सबंध महाराष्ट्रातील लोकशाहीवादी नागरिकांचे आभार. मात्र, आपण कोणीही काळजी करू नका मी सुखरुप आहे. आपणा सर्वांची साथ आहे तोपर्यंत जिल्ह्यातील गुंड प्रवृत्तीच्या विरोधात आवाज उठवत राहील, सर्वसामान्यांसाठी लढत राहील, असे त्यांनी म्हटले आहे.
 
दरम्यान, हा प्रकार सुरु असताना तिथपासून 150 फूट अंतरावर राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या पत्नी सारिका यांची कॉर्नर बैठक सुरु होती, असे पोलिसांनी सांगितले आहे. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी गणेश कदम याने दारूच्या नशेत आणि वैयक्तिक वादातून केलेले कृत्य आहे. घडलेली घटना ही सभेच्या ठिकाणापासून किमान शंभर ते दीडशे फूट अंतरावर आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारे सारिका बजरंग सोनवणे यांच्यावर वार करण्याचा प्रकार झालेला नाही, असे अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक अजित बोराडे यांनी सांगितले आहे.  निवडणूक कालावधीमध्ये अशा अफवा पसरवल्या जाणे हे कायदा आणि सुव्यवस्थेसाठी घातक आहे. फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन धारूर येथे गुन्हा दाखल झालेला असून लवकरात लवकर आरोपीस अटक करण्यात येईल, असे बोराडे यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Crime News : यू-ट्यूबरवर व्हिडीओ पाहिला, औषधी वनस्पतींचे मिश्रण केले; शाळकरी मुलगा तरुणीचा गर्भपात करत बसला; पुढे थरकाप उडवणारं घडलं!
यू-ट्यूबरवर व्हिडीओ पाहिला, औषधी वनस्पतींचे मिश्रण केले; शाळकरी मुलगा तरुणीचा गर्भपात करत बसला; पुढे थरकाप उडवणारं घडलं!
Chandrapur Tiger Attack: शेतात काम करत असताना दबा धरून बसलेल्या वाघाची झडप; पतीच्या डोळ्यादेखत पत्नीचा जागीच दुर्दैवी अंत; चंद्रपूरचं पळसगाव हादरलं!
शेतात काम करत असताना दबा धरून बसलेल्या वाघाची झडप; पतीच्या डोळ्यादेखत पत्नीचा जागीच दुर्दैवी अंत; चंद्रपूरचं पळसगाव हादरलं!
Shivsena Eknath Shinde: एकनाथ शिंदे अकार्यक्षम मंत्र्यांवर नाराज, शिवसेनेत लवकरच मोठे फेरबदलाची शक्यता; तरुण आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार
एकनाथ शिंदे अकार्यक्षम मंत्र्यांवर नाराज, शिवसेनेत लवकरच मोठे फेरबदलाची शक्यता; तरुण आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार
Maharashtra Live News Updates:वाढत्या महागाईचा फटका मुंबईतील हॉटेल ग्राहकांना बसणार; खाद्य पदार्थांच्या दरात वाढ होण्याची शक्यता 
Maharashtra Live News Updates: वाढत्या महागाईचा फटका मुंबईतील हॉटेल ग्राहकांना बसणार; खाद्य पदार्थांच्या दरात वाढ होण्याची शक्यता 

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Annapurti ATM : अन्नपूर्ति ATM मधून 24 तासात कधीही धान्य मिळणार, रेशनिंग वितरणात नाशिकमधून नवी सुरुवात, छगन भुजबळ यांच्या हस्ते लोकार्पण
छगन भुजबळ यांच्या हस्ते नाशिकमध्ये अन्नपूर्ति ATM चं लोकार्पण, लाभार्थ्यांसाठी सुविधा 24 तास सुरु राहणार
Shivsena Eknath Shinde: एकनाथ शिंदे अकार्यक्षम मंत्र्यांवर नाराज, शिवसेनेत लवकरच मोठे फेरबदलाची शक्यता; तरुण आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार
एकनाथ शिंदे अकार्यक्षम मंत्र्यांवर नाराज, शिवसेनेत लवकरच मोठे फेरबदलाची शक्यता; तरुण आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार
Pune Crime News: पुण्यात अजित पवार गटाच्या दोन नगरसेवकांवर गुन्हा; मनपा अभ्यासिका-ग्रंथालयाची तोडफोड आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप
पुण्यात अजित पवार गटाच्या दोन नगरसेवकांवर गुन्हा; मनपा अभ्यासिका-ग्रंथालयाची तोडफोड आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप
Chhatrapati Sambhajinagar : दुष्काळाची दाहकता! जनावरांचा चारा चोरीला जाऊ नये म्हणून वैरणीला कुलूप, भीषण वास्तव समोर
दुष्काळाची दाहकता! जनावरांचा चारा चोरीला जाऊ नये म्हणून वैरणीला कुलूप, भीषण वास्तव समोर
पदवीधर निवडणुकीवरून मोठा ट्विस्ट!आदल्या दिवशी सतीश चव्हाणांचा पाठिंबा काढला, आज शिंदेसेनेनं पुन्हा महायुतीला जवळ केलं; एका रात्रीत काय घडलं?
पदवीधर निवडणुकीवरून मोठा ट्विस्ट!आदल्या दिवशी सतीश चव्हाणांचा पाठिंबा काढला, आज शिंदेसेनेनं पुन्हा महायुतीला जवळ केलं; एका रात्रीत काय घडलं?
Pune Teacher Election : पुणे शिक्षकमध्ये पहिल्या फेरीत 25 हजारापेक्षा जास्त मतं घेऊन विजयी होणार, माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी थेट आकडेवारी मांडत विजयाचं गणित सांगितलं
पुणे शिक्षकमध्ये भाजप-सेनेचे स्वतंत्र उमदेवार रिंगणात,  माजी आमदार दत्तात्रय सावंत प्रचंड आशावादी, पहिल्या फेरीत विजयाचा दावा 
RBI : बँकिंग क्षेत्रात मोठ्या घडामोडी सुरु,दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी
दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी
FDA Action : कार्यक्षेत्राच्या बाहेर टाकली रेड; पर्सनल इंटरेस्ट असल्याचा ठपका, एफडीएच्या 20 हून अधिक अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार
कार्यक्षेत्राच्या बाहेर टाकली रेड; पर्सनल इंटरेस्ट असल्याचा ठपका, एफडीएच्या 20 हून अधिक अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार
Embed widget