बीड: सासूच्या सांगण्यावरून पतीने विवाहितेला मारहाण केल्याची घटना बीडच्या अंबाजोगाईत घडलीय. या प्रकरणी राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा संगीता तुपसागर यांच्यासह पीडितेचा पती भुजंग भुतावळे या दोघांविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपींमध्ये राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षांचा समावेश असल्याने राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा होत आहे. संगीता तपसागर या पीडितेच्या मानलेल्या सासू आहेत.


राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षांवर गंभीर आरोप
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बीड जिल्हा महिला जिल्हाध्यक्षांवर त्यांच्याच दत्तक घेतलेल्या मुलाच्या पत्नीने मारहाणीसह इतर गंभीर आरोप केले आहेत. अंबाजोगाईच्या शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत पीडित महिलेने सदरचे आरोप केले आहेत. दरम्यान ‌‌या प्रकरणी ‌‌‌शहर‌ पोलीस ठाण्यात रितसर ‌‌‌तक्रार दिली असल्याचेही पीडित महिलेचे म्हणणे आहे.


शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ‌‌पीडित महिलेने सांगितले की, बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा संगिता तुपसागर यांनी ‌त्यांच्या दत्तक घेतलेल्या मुलाचे पहिले‌ लग्न झालेले असतानाही अंधारात ‌‌‌‌‌‌‌‌‌ठेवून, खोटी माहिती देऊन 19 सप्टेंबर 2021 ला ‌‌‌‌‌‌‌लग्न लावून दिले. लग्नानंतर त्या गेली पाच‌ महिने‌ घरातील सर्व ‌‌‌‌‌‌कामे करुन घेत असून जाणूनबुजून संगिता तुपसागर आपल्याला मारहाण करून त्रास देत आहेत. कधी अंगावर गरम पाणी टाकणे तर कधी वाटेल ती धमकी त्या देत आहेत. या गोष्टींना कंटाळून शहर पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दिली आहे.‌ 


त्यासोबतच सदर पीडित महिलेने पत्रकार परिषद घेऊन अनेक गंभीर आरोप संगिता तुपसागर यांच्यावर केले आहेत. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला तालुकाध्यक्षा अंजली पाटील, वर्षा रायभोळे यांची उपस्थिती होती.


राजकीय सूडबुद्धीने आरोप
हे सगळे आरोप राजकीय सूडबुद्धीतून झाले असल्याचे बीडच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष संगीता तूपसागर यांचे म्हणणे आहे.


काय म्हणाल्या संगीता तूपसागर? 
संगीता तूपसागर म्हणाल्या की, "प्रेरणा भुजंग भुतावळे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून अंजली पाटील आणि वर्षा रायभोळे या घाणेरडे राजकारण करत आहेत. संबंधित प्रेरणा भुतावळे यांच्याशी माझा काहीही संबंध नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीची महिला जिल्हाध्यक्ष असून, मी सामाजिक बांधीलकीतून पूर्ण वेळ काम करत असते. पदाच्या माध्यमातून अनेकांना न्याय मिळवून देण्याचा मी प्रयत्न केला आहे. माझा जिल्ह्यात व पक्षामध्ये प्रभाव वाढत असल्यामुळे पक्षांतर्गत कुरघोडीतून अंबाजोगाई तालुकाध्यक्ष अंजली पाटील व सचिव वर्षा रायभोळे यांनी प्रेरणा भुजंग भुतावळे हिच्या खांद्यावर बंदूक ठेवून माझी बदनामी करण्यासाठी कुटील कारस्थान रचून मला बदनाम करण्याचा प्रयत्न चालविला जात आहे. सदर प्रकाराची माहिती मी राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष  रूपाली चाकणकर यांच्याकडे दिली आहे. प्रेरणाचा पती भुजंग भुतावळे हा ड्रायव्हर म्हणून माझ्याकडे गेल्या सात-आठ वर्षांपासून कामास आहे. त्याला मी माझ्या मुलाप्रमाणे मानते, तो माझ्याच घरी भाड्याने राहतो, चार-पाच महिन्यापूर्वी त्याचे लग्न झाले. त्याचा आणि त्याच्या पत्नीचा हा वैयक्तिक वाद आहे, त्या वादाची मला कसलीही कल्पना नाही. सदरील षढयंत्राची माहिती मला 13 फेब्रुवारी 2022 रोजी लागली होती. त्या दिवशी माझ्या राहत्या घरी येऊन वर्षा भुतावळे, मनोज भुतावळे यांनी तू राजकारण कशी करतेस ते बघेन असे म्हणत मला जिवे मारण्याच्या धमकी दिली. सदरील प्रकरणी मी अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनमध्ये रोजी रितसर तक्रार दिली आहे."


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha