Beed News : परतीच्या पावसानं (Rain) राज्यातील बळीराजा पुरता कोलमडलाय आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांची हातची पिकं वाया गेली आहेत. बीड (Beed) जिह्यातही परतीच्या पावसानं थैमान घातलं आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना (Farmers) बसलाय. अद्याप काही ठिकाणी पंचनामे देखील झालं नाहीत. तसेच पीक विम्याची अग्रीम रक्कम देखील शेतकऱ्यांना मिळाली नसल्यानं शेतकरी हतबल झाले आहेत. दरम्यान, बीडचे पालकमंत्री अतुल सावे (Minister Atul Save) हे माजलगावचा दौऱ्यावर आले होते. त्यादरम्यान शेतकरी संघर्ष समितीनं त्यांचा ताफा अडवल्याची घटना घडली. अचानक ताफा अडवल्यानं शेतकरी आणि पोलिसांमध्ये थोडा काळ तणाव निर्माण झाल्याचे पाहायला मिळालं.


परतीच्या पावसानं बीड जिल्ह्यातील पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. पंचनामे तर सोडा मात्र पीक विम्याची अग्रीम रक्कम देखील मिळाली नसल्यानं शेतकरी हतबल झाले आहेत. पालकमंत्री अतुल सावे हे माजलगावचा दौऱ्यावर आले होते. त्यादरम्यान शेतकरी संघर्ष समितीने त्यांचा ताफा अडवल्याचा प्रकार घडला. अचानक ताफा अडवल्यानं शेतकरी आणि पोलिसांत थोडा काळ तणाव निर्माण झाला होता. ओल्या दुष्काळाची जिल्ह्यावर गडद छाया असतानाच पालकमंत्री अतुल सावे मात्र बीडचं पालकत्व स्वीकारल्यानंतर केवळ दुसऱ्यांदा बीड जिल्ह्यात आले आहेत. यावेळी शेतकरी चांगलच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.




परतीच्या पावसानं बळीराजा कोलमडला


दरम्यान, पीक विम्याच्या रकमेसाठी माजलगावातील शेतकरी संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. त्यामुळेच संतप्त शेतकऱ्यांनी पालकमंत्री अतुल सावेंचा ताफा अडवला. सुरुवातीला अतिवृष्टीचा मोठा फटका शेतकऱ्यांच्या पिकांना बसला होता. या फटक्यातून शेतकऱ्यांची पिकं कशीबशी वाचली होती. त्यानंतर सोयाबीनवर गोगलगायीचं संकट आलं, त्यातूनही शेतकरी कसाबसा सावरला. मात्र, त्यानंतर आलेल्या परतीच्या पावसानं शेतकरी मात्र, पुरता कोलमडला आहे. सोयाबीनची माती आणि कापसाच्या वाती झाल्याची स्थिती निर्माण झाली आहे. आता हाती काहीच येण्याची शक्यता नसल्यानं शेतकरी संकटात सापडला आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांनी त्वरीत पंचनामे करुन सरसकट मदत करावी अशी मागणी केली आहे. तसेच ओला दुष्काळ जाहीर करावा असं आवाहन देखील शेतकऱ्यांनी सरकारला केलं आहे.


मराठवाड्यात काही शेतकऱ्यांनी  उचललं टोकाचं पाऊल


वाढत जाणारं नुकसान आणि कर्जाचा डोंगर या तणावामुळं शेतकरी चिंतेत आहेत. मोठा फटका शेतकऱ्यांच्या पिकाला बसल्यामुळं शेतकरी तणावात असल्यानं टोकाचं पाऊल उचलत आहेत. बीड जिल्ह्यात देखील एका शेतकऱ्यानं जीवन संपवल्याची घटना ङडली आहे. त्याचबरोबर परभणीत दोन शेतकऱ्यांनी, नांदेडमध्ये एका शेतकऱ्यानं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


शेतकऱ्याची 'दिवाळी' गोड करा, एबीपी माझा'चं जनतेला आवाहन