Aurangabad Rain News: औरंगाबाद जिल्ह्यात जुलै महिन्यात पावसाने (Rain) बहुतांश ठिकाणी जोरदार हजेरी लावली होती. मात्र सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यांतच अतिवृष्टीने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. या दोन महिन्यांच्या 52 दिवसांत तब्बल 32 दिवस पावसाने हजेरी लावली आहे. ज्यामुळे या काळात 6 लाख 79 हजार 56 शेतकऱ्यांचे 4 लाख 43 हजार 942.51 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यात 96 हजार 954 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.
कधीकाळी कोरड्या दुष्काळामुळे ओळखल्या जाणाऱ्या मराठवाड्यात सलग चार वर्षांपासून शेतकऱ्यांचा खरीप हंगाम संकटात आला आहे. यंदा जिल्ह्यात परतीच्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला असून, काढणीला आलेले पीकं हातून गेली आहे. अगोदरच जिल्ह्यात सततच्या पावसाने 16 हजार 410 शेतकऱ्यांचे 12679 हेक्टर क्षेत्रातील पिकाचे नुकसान झाले आहे. त्यातच आता उरल्यासुरल्या पिकाचे परतीच्या पावसाने होत्याच नव्हते करून ठेवलं आहे.
जिल्ह्यातील दोन महिन्यातील नुकसानीची कडेवारी (सप्टेंबर-ऑक्टोबर)
तालुका | बाधित शेतकरी | बाधित क्षेत्र |
औरंगाबाद | 47157 | 21632 |
पैठण | 94172 | 58768 |
फुलंब्री | 52457 | 24696.82 |
गंगापूर | 81989 | 62138 |
वैजापूर | 143969 | 96654 |
खुलताबाद | 27555 | 16299 |
कन्नड | 90743 | 63467 |
सिल्लोड | 108034 | 63519.69 |
सोयगाव | 32980 | 36468 |
पाहावं तिकडे पाणीच-पाणी
औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक भागात अतिवृष्टी तर काही ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस पडला आहे. अनेक ठिकाणी आजही शेतात पाणी तुंबलेल्या अवस्थेत आहे. खरीपचे पिके हातून गेली आहे. सोयाबीन,कापूस आणि मका या तीन पिकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. दिवाळी सारखं सण देखील बळीराजा साजरा करू शकत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे सरकारने सरसकट पंचनामे करून थेट मदत करण्याची मागणी शेतकरी करतायत.
संबंधित बातमी...