एक्स्प्लोर

Beed: पावसाची पॉवर! बीडचं माजलगाव धरण शुन्यावरुन थेट 18 टक्क्यांवर; 31 हजार क्युसेकने पाण्याची आवक सुरु

विदर्भ आणि मराठवाड्यात पावसानं सर्वत्र एकच हैदोस घातला असून अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसानं दाणादाण उडवली आहे.

Beed: राज्यात मुसळधार पावसानं थैमान घातलं आहे. मराठवाड्यात एकीकडे पावसाचा जोर वाढला असून हिंगोली, नांदेड, परभणी शहराला पुरानं वेढा घातला आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी शुन्यावर असणारं बीडचं माजलगाव धरण थेट 18 टक्क्यांवर गेलं आहे. मृतसाठा आता जिवंत झाला असून बीडमधील धरण प्रकल्प खळाळले आहेत. मागील दोन दिवसांपासून पावसाची संततधार या भागात दिसून येत आहे. सोमवारी संध्याकाळपर्यंत १८ टक्कयांची नोंद धरणात झाल्याची अधिकृत माहिती आहे.

जायकवाडी धरणाचे पाणी माजलगाव धरणात आज दाखल झाले असून धरण भरण्यास या पाण्याचा देखील मोठा फायदा होत आहे. दरम्यान जोरदार पावसामुळे खरिपातील कापूस,सोयाबीन,तीळ, उडीद, तुर या पिकांसह इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले असुन धरणात सकाळी 10 वाजता 31 हजार क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू होती. 

शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत

माजलगाव तालुक्यात मागील आठ दहा दिवसापासून गायब झालेल्या वरुणराजाने शनिवारी मध्यरात्री जोरदार हजेरी लावली. रविवारी मध्यरात्री थोड्या प्रमाणात तर सोमवारच्या पहाटेपर्यंत कमी जास्त प्रमाणात पाऊस सुरूच होता. या पावसामुळे मृतसाठ्यात असलेले माजलगाव धरण मृत साठ्याबाहेर येत थेट 18  टक्क्यावर आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

माजलगाव एरवी भरते परतीच्या पावसावर

माजलगाव धरण दरवर्षी हे परतीच्या पावसावरच भरते.  मागील दोन-तीन वर्षांपूर्वी देखील अत्यल्प पाणीसाठा असलेले माजलगाव धरण परतीच्या पावसावरच भरले होते. मागील वर्षी सरासरीहून कमी पाणीसाठा झाल्यानं माजलगाव धरण कोरडंठाक झालं होतं. दोन दिवसांपूर्वी मृतसाठ्यात असणारं माजलगाव धरण आता भरेल अशी आशा शेतकऱ्यांना लागली आहे. .

31 हजार क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू

सध्या पावसाच्या पाण्याची आवक धारणात सुरू असल्याने सोमवारी सायंकाळी माजलगाव धरण 18 टक्क्यावर आले आहे आणि जायकवाडी धरणातून व पावसाच्या पाण्याची आवक माजलगाव धरणात सुरूच आहे. दरम्यान सोमवारी सकाळी दहा वाजता माजलगाव धरणात 31 हजार क्यूसेक वेगाने पाण्याची आवक सुरू होती..जायकवाडीचे पाणी माजलगाव धरणात दाखल हाेत असून शहरासह तालुका परिसरात पावसाची तुफान बॅटिंग सुरु आहे. पिकांचे अतोनात नुकसान झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

बीड जिल्ह्यातील धरण प्रकल्प ओसंडून वाहतायत

बीड जिल्ह्याभरात झालेल्या पावसामुळे छोटे-मोठे प्रकल्प आता ओसंडून वाहत आहेत.सलग दोन दिवसाची संततधारेमुळे धारुर तालुक्यातील हिंगणी येथील तलाव भरल्याने तलावाच्या सांडव्यावरून पाणी पडू लागले आहे. तर दुसरीकडे सरस्वती नदीला पूर आला आहे.हिंगणी तलाव भरल्याने आता धारूर चा पाण्याचा प्रश्न मिटला असून याचा फायदा परिसरातील शेतकऱ्यांनाही होणार आहे.

मराठवाड्यात मुसळधार पाऊस

विदर्भ आणि मराठवाड्यात पावसानं सर्वत्र एकच हैदोस घातला असून अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसानं दाणादाण उडवली आहे. तर अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती ओढावल्यानं जनजीवन विस्कळीत झालं असून नागरिकांचीही तारांबळ उडाली आहे. दरम्यान, हवामान विभागानं आज देखील विदर्भ, मराठवाड्यातील अनेक जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून पावसाचा जोर लक्षात घेता योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाने नागरिकांना दिल्या आहेत.

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 ऑक्टोबर 2026 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 ऑक्टोबर 2026 | गुरुवार 
बॅलेटवर निवडणूक तरीही काँग्रेस पराभूत, आता केळाच्या पानावर निवडणूक घ्या अशीही मागणी करतील, भाजप आमदार परिणय फुकेंचा हल्लाबोल 
बॅलेटवर निवडणूक तरीही काँग्रेस पराभूत, आता केळाच्या पानावर निवडणूक घ्या अशीही मागणी करतील, भाजप आमदार परिणय फुकेंचा हल्लाबोल 
अमूलच्या दावणीला गोकुळ बांधण्यासाठी तुम्ही सगळं कारस्थान करताय, हे आम्हाला कळत नाही का? राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल, विश्वजित कदम अन् सुप्रिया सुळेंचाही सडकून प्रहार
अमूलच्या दावणीला गोकुळ बांधण्यासाठी तुम्ही सगळं कारस्थान करताय, हे आम्हाला कळत नाही का? राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल, विश्वजित कदम अन् सुप्रिया सुळेंचाही सडकून प्रहार
Virar Crime News: बंद फ्लॅटमध्ये तीन भावंडांचे आढळले मृतदेह; विरारमध्ये खळबळ, प्राथमिक कारण चक्रावून टाकणारं, नेमकं काय घडलं?
बंद फ्लॅटमध्ये तीन भावंडांचे आढळले मृतदेह; विरारमध्ये खळबळ, प्राथमिक कारण चक्रावून टाकणारं, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण
Sanjay Raut On BJP : महाराष्ट्रात बॅलेटवर निवडणुका झाल्या, तुम्ही हारला आहात! राऊतांनी सुनावलं
Raj Thackeray Karjat Full Speech : महाराष्ट्र उद्योगपतींच्या चावीवर चालणार नाही! राज ठाकरेंची गर्जना
Shiv Sena PC On Pradeep Purnekar Case :एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Pratap Patil On Win : मराठवाड्यातील पदवीधरांच्या रोजगारासाठी मी काम करणार : प्रताप पाटील

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil: तेव्हा मी जातीवादी नव्हतो का? देशाला नव्हे जगाला माहितीय, आमच्याकडे बहुमत, जनक्षोभ निर्माण होईल; सतेज पाटलांचे हसन मुश्रीफांना प्रत्युत्तर, म्हणाले, यांना गोकुळ बंद पाडायचाय
तेव्हा मी जातीवादी नव्हतो का? देशाला नव्हे जगाला माहितीय, आमच्याकडे बहुमत, जनक्षोभ निर्माण होईल; सतेज पाटलांचे हसन मुश्रीफांना प्रत्युत्तर, म्हणाले, यांना गोकुळ बंद पाडायचाय
Pune Graduate And Teachers Election Result 2026: पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निकाल: संघटनात्मक ताकद अन् नाराजीचे फॅक्टर ठरले निर्णायक; जाणून घ्या दोन्ही निकालांची कारणं
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निकाल: संघटनात्मक ताकद अन् नाराजीचे फॅक्टर ठरले निर्णायक; जाणून घ्या दोन्ही निकालांची कारणं
अमूलच्या दावणीला गोकुळ बांधण्यासाठी तुम्ही सगळं कारस्थान करताय, हे आम्हाला कळत नाही का? राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल, विश्वजित कदम अन् सुप्रिया सुळेंचाही सडकून प्रहार
अमूलच्या दावणीला गोकुळ बांधण्यासाठी तुम्ही सगळं कारस्थान करताय, हे आम्हाला कळत नाही का? राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल, विश्वजित कदम अन् सुप्रिया सुळेंचाही सडकून प्रहार
Abdul Sattar : युती टिकवायची की तोडायची भाजपने ठरवावं, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात निवडणुका झाल्या, आता त्यांनीच मुख्यमंत्री व्हावं : अब्दुल सत्तार
युती टिकवायची की तोडायची भाजपने ठरवावं, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात निवडणुका झाल्या, आता त्यांनीच मुख्यमंत्री व्हावं : अब्दुल सत्तार
Sunetra Pawar: पदवीधर, शिक्षक निकालानंतर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'आम्ही आत्मपरीक्षण करू; सुधारण्याचा प्रयत्न करू...'
पदवीधर, शिक्षक निकालानंतर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'आम्ही आत्मपरीक्षण करू; सुधारण्याचा प्रयत्न करू...'
Hasan Mushrif on Satej Patil: सतेज पाटलांनी जातीयवादी प्रचार केला, आता गोकुळचा अध्यक्ष निवडून दाखवावाच; हसन मुश्रीफांचं ओपन चॅलेंज
सतेज पाटलांनी जातीयवादी प्रचार केला, आता गोकुळचा अध्यक्ष निवडून दाखवावाच; हसन मुश्रीफांचं ओपन चॅलेंज
Meenakshi Shinde मोठी बातमी : मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा, प्रदीप पूर्णेकर प्रकरणात चौकशीनंतर निर्णय
मोठी बातमी : मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा, प्रदीप पूर्णेकर प्रकरणात चौकशीनंतर निर्णय
Pune Accident News: वाहनावरील नियंत्रण सुटलं अन्...; दुचाकीची वाहनाला जोरदार धडक, राजगुरुनगरमध्ये अपघातात 17 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू
वाहनावरील नियंत्रण सुटलं अन्...; दुचाकीची वाहनाला जोरदार धडक, राजगुरुनगरमध्ये अपघातात 17 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू
Embed widget