एक्स्प्लोर

पोलिसांची दादागिरी, शेतकऱ्यांसह पत्रकाराला बेदम मारहाण

पोलिसांनी पीक विम्यासाठी रांगेत उभे असलेल्या शेतकऱ्यांवर लाठीमार केलाच. मात्र पोलिसांची ही दादागिरी समोर आणणाऱ्या पत्रकारालाही त्यांनी बेदम मारहाण केली.

बीड: पोलिसांची दादागिरी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. कारण पोलिसांनी पीक विम्यासाठी रांगेत उभे असलेल्या शेतकऱ्यांवर लाठीमार केलाच. मात्र पोलिसांची ही दादागिरी समोर आणणाऱ्या पत्रकारालाही त्यांनी बेदम मारहाण केली. पीक विम्यासाठी शिवार सोडून बँकेच्या रांगेत उभे असलेल्या शेतकऱ्यांवर पोलीस लाठीचार्ज करत आहेत. पोलिसांची ही मग्रुरी माध्यमं जनतेसमोर आणत असताना, आता पोलिसांची दादागिरी थेट माध्यम प्रतिनिधींवर हात उचलण्यापर्यंत पोहोचली आहे. माजलगावात बँकेच्या रांगेत उभे असलेल्या शेतकऱ्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी गेलेल्या पत्रकाराला, पोलिसांनी बेदम मारहाण केली. माजलगावमधील बँकेसमोर शेतकऱ्यांची रांग होती. या रांगेतील शेतकऱ्यांवर पी एस आय अंधारे आणि पोलीस कॉन्स्टेबल सिनगारे यांनी लाठीमार केला. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या स्थानिक दैनिकाचे वार्ताहर मिलिंद चोपडे यांनी पोलिसांचा लाठीमार मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला. मात्र हे एका पोलिसाने पाहिलं आणि त्यांनी थेट चोपडे यांच्या अंगावर धाव घेतली. त्यांनी मोबाईल काढून घेऊन, थेट चोपडे यांना मारहाण केली. यावेळी चोपडे यांनी आपण पत्रकार असल्याचं सांगितलं, पण तू कोण पत्रकार, अशी अरेरावी करत, पोलिसांनी त्यांना बेदम मारहाण केली. पीक विमा भरण्यासाठी आधी ऑनलाईन आणि मग आता ऑफलाईन सुरुवात केली आहे. सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे शेतकऱ्यांना रान सोडून रांगेत उभं राहावं लागत आहे. त्यातच रांगेत उभं राहूनही जर पोलिसांचा मार खावा लागत असेल, तर गृहमंत्री आणि मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी वेळीच पावलं उचलण्याची गरज आहे. कारण आघाडी सरकारच्या काळात मावळमध्ये शेतकऱ्यांवर झालेल्या गोळीबारावेळी, विरोधात असलेल्या शिवसेना-भाजपने  रान उठवलं होतं. मात्र तोच प्रकार जर फडणवीसांच्या काळातही घडणार असेल तर तुमच्यात आणि त्यांच्यात फरक काय? असा प्रश्न आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Flood: नाशिककरांनो काळजी घ्या! गोदावरीला यंदाच्या मोसमातील सर्वात मोठा पूर; संध्याकाळपर्यंत नदी धोक्याची पातळी ओलांडणार
नाशिककरांनो काळजी घ्या! गोदावरीला यंदाच्या मोसमातील सर्वात मोठा पूर; संध्याकाळपर्यंत नदी धोक्याची पातळी ओलांडणार
Mumbai Protest: तरुणी थेट भिडली; आंदोलकांना घेऊन जाल तर खबरदार; पोलिस व्हॅनच्या समोर थांबली अन्...कोण आहे अहीर?
तरुणी थेट भिडली; आंदोलकांना घेऊन जाल तर खबरदार; पोलिस व्हॅनच्या समोर थांबली अन्...कोण आहे अहीर?
संभाजीनगरमधील प्रसिद्ध हॉटेल FDA कडून सील; जिलेबीच्या गोडव्यात भेसळ, तुकाराम मुंढेंच्या विभागास काय आढळल्या त्रुटी
संभाजीनगरमधील प्रसिद्ध हॉटेल FDA कडून सील; जिलेबीच्या गोडव्यात भेसळ, तुकाराम मुंढेंच्या विभागास काय आढळल्या त्रुटी
Maharashtra Live News Updates: नाशिकमध्ये मुसळधार पावसाने गोदावरीला पूर; रामसेतू पाण्याखाली, पुराचे पाणी बघण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी
Maharashtra Live News Updates: नाशिकमध्ये मुसळधार पावसाने गोदावरीला पूर; रामसेतू पाण्याखाली, पुराचे पाणी बघण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी

व्हिडीओ

NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भाषणात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून नंतर भाजपत घेतलं त्यांच्यासाठी पहिल्यांदा फास्ट ट्रॅक कोर्ट करा, त्यांची सीबीआय चौकशी का थांबवली? कपिल सिब्बलांचा मोदींवर हल्लाबोल
भाषणात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून नंतर भाजपत घेतलं त्यांच्यासाठी पहिल्यांदा फास्ट ट्रॅक कोर्ट करा, त्यांची सुरु असलेली सीबीआय चौकशी का थांबवली? कपिल सिब्बलांचा मोदींवर हल्लाबोल
CJP Protest: जंतरमंतरवरती आंदोलनावेळी शांत उभारलेल्या महिलेच्या कानाखाली मारली; व्हिडीओ व्हायरल झाला, ADCP ची पोस्टिंग केली थेट....
जंतरमंतरवरती आंदोलनावेळी शांत उभारलेल्या महिलेच्या कानाखाली मारली; व्हिडीओ व्हायरल झाला, ADCP ची पोस्टिंग केली थेट....
संभाजीनगरमधील प्रसिद्ध हॉटेल FDA कडून सील; जिलेबीच्या गोडव्यात भेसळ, तुकाराम मुंढेंच्या विभागास काय आढळल्या त्रुटी
संभाजीनगरमधील प्रसिद्ध हॉटेल FDA कडून सील; जिलेबीच्या गोडव्यात भेसळ, तुकाराम मुंढेंच्या विभागास काय आढळल्या त्रुटी
जंतरमंतरवर पोलिसांचा मार खात विद्यार्थ्यांचा न्यायासाठी संघर्ष सुरुच असतानाच आता संसदेच्या दारात खडाजंगी; खासदार आमनसामने, प्रियांका गांधी घोषणाबाजी करतच एनडीएच्या खासदारांकडे पोहोचल्या
जंतरमंतरवर पोलिसांचा मार खात विद्यार्थ्यांचा न्यायासाठी संघर्ष सुरुच असतानाच आता संसदेच्या दारात खडाजंगी; खासदार आमनसामने, प्रियांका गांधी घोषणाबाजी करतच एनडीएच्या खासदारांकडे पोहोचल्या
Police Threats Students :
"पुन्हा दिसलात तर 50 ग्रॅम ड्रग्स टाकून आत टाकू!"; नीट पेपर फुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबई पोलिसांची धमकी; व्हिडिओ व्हायरल होताच चौकशीचे आदेश
बीडमध्ये विद्यार्थ्यास NEET मध्ये 95 गुण; हायकोर्टाचे एनटीएला नोटीस, उत्तरपत्रिका कोर्टात जमा करण्याचे आदेश
बीडमध्ये विद्यार्थ्यास NEET मध्ये 95 गुण; हायकोर्टाचे एनटीएला नोटीस, उत्तरपत्रिका कोर्टात जमा करण्याचे आदेश
'परत या एरियात जर दिसलात, तर 50 ग्रॅमची ड्रग्ज पावडर टाकीन..' म्हणजे पोलिसांकडे आता पावडर पण मिळायला लागली? हा पोलीस कोण ड्रग सप्लायर आहे का? राज ठाकरेंकडून धमकी देणाऱ्या व्हायरल व्हिडिओची दखल
'परत या एरियात जर दिसलात, तर 50 ग्रॅमची ड्रग्ज पावडर टाकीन..' म्हणजे पोलिसांकडे आता पावडर पण मिळायला लागली? हा पोलीस कोण ड्रग सप्लायर आहे का? राज ठाकरेंकडून धमकी देणाऱ्या व्हायरल व्हिडिओची दखल
पोलीस कर्मचाऱ्यांकडे ड्रग्ज येतात कुठून? हे कृत्य खाकी वर्दीला काळीमा फासणारे; सुप्रिया सुळेंनी थेट मुख्यमंत्र्यांनाच विचारलं
पोलीस कर्मचाऱ्यांकडे ड्रग्ज येतात कुठून? हे कृत्य खाकी वर्दीला काळीमा फासणारे; सुप्रिया सुळेंनी थेट मुख्यमंत्र्यांनाच विचारलं
Embed widget