बीड : ऑस्करसाठी एखाद्या चित्रपटाला साधं नामांकन मिळणं हे सुद्धा एखाद्या पुरस्कारापेक्षा कमी नसतं मात्र बीड पोलीसांनी तयार केलेल्या एका लघुपटाला फिल्म फेयर अवॉर्डमध्ये नॉमिनेशन मिळाले आहे. विधानसभा निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी बीड जिल्हा पोलीस दलाकडून जनजागृतीसाठी एक लघुपट तयार करण्यात आला होता. या लघुपटाची निवड राष्ट्रीय फिल्म फेअर शॉट फिल्म अवार्डसाठी करण्यात आली असून देशभरात हा लघुपट आदर्श म्हणून पाहिला जाणार आहे. ही गोष्ट बीड पोलिसांसाठी आभिमानास्पद आहे अशा भावना बीडचे पोलिस अधीक्षक हर्ष पोतदार यानी व्यक्त केल्या आहेत.


यापूर्वी या लघुपटाला केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाकडून आयोजित करण्यात आलेल्या लघुपट महोत्सावात सर्वोत्कृष्ट लघुपट म्हणून पुरस्कार देण्यात आला आहे. या लघुपटात पोलीस दलातील कर्मचारी तसेच स्थानिक कलाकारांनी अभिनय केला होता. या लघुपटास 'आम्ही दक्ष मतदारांचा पक्ष' असे नाव देण्यात आले होते. लघुपटाचे दिग्दर्शन आरती बागडी यांनी केले आहे.


मतदारांनी कोणत्याही अमिषाला आणि भितीला बळी न पडता नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा कुठेही अडचण आली तर बीड पोलीस दल नागरिकांच्या सुरक्षेसाठी तयार आहे. असा संदेश देणाऱ्या 'आम्ही दक्ष, मतदारांचा पक्ष' या लघुपटाची निर्मितीबीडचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या संकल्पनेतून करण्यात आली होती. यामध्ये सर्व कलाकार हे बीड पोलिस दल आणी ग्रामीण भागातील आहेत. या लघुपटाचे दिग्दर्शन मुंबई येथील आरती बागडी यांनी केले. तर लेखक वर्षा खरीदहा यांनी केले. ताडसोन्ना आणि बीड येथील स्थानिक कलाकार सोहम सवई, दिपाली रुईकर, रंजित वाघमारे, महादेव सवई, पोलीस कर्मचारी अनिल शेळके व इतर कर्मचाऱ्यांनी भूमिका केली आहे. ही अभिमानाचि गोष्ट आहे असे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार म्हणाले.


संबंधित बातम्या : 


एकाचं रस्त्याचा चौथ्यांदा शुभारंभ, एकदा पंकजा मुंडे, दोनदा कॉन्ट्रॅक्टर तर आता धनंजय मुंडे करणार उद्घाटन