- प्रजासत्ताक दिनी हवाई हल्लाच्या धोका, गृहमंत्रालयाकडून सुरक्षा यंत्रणांना सावधगिरीच्या सूचना, ड्रोनद्वारे हल्ला होण्याची शक्यता व्यक्त
- केंद्रीय गृहमंत्रालयाकडून एल्गार परिषद प्रकरणाचा तपास एनआयएकडे, राज्य आणि केंद्रामध्ये ठिणगी, काँग्रेस-राष्ट्रवादीची केंद्रावर टीका
- मनसेचे दोन झेंडे म्हणजे घसरलेल्या गाडीचं लक्षण, सामनातून टीकास्त्र, राज ठाकरेंच्या नव्या भूमिकेमागे भाजप असल्याचाही आरोप
- महाराष्ट्रातल्या कृषी विकासासाठी सरकारचा जागतिक बँकेसोबत 1500 कोटीचा करार, ग्रामीण भागाचा कायापालट करण्यावर भर देणार
- म्हाडामध्ये पोलीस शिपाई, चतुर्थश्रेणी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 10 टक्के आरक्षण ठेवण्याचा ठाकरे सरकारचा विचार, जितेंद्र आव्हाडांची माहिती
- मुंबईच्या नाईटलाईफमध्ये रात्री दीडनंतर मद्यविक्रीस बंदी, जुहू, गिरगाव चौपाटी, वरळी सीफेस, नरिमन पॉईंटवर उपहारगृह चालवण्यास परवानगी
- मध्य रेल्वेच्या ट्रान्स हार्बर मार्गावर 31 जानेवारीपसून गारेगार प्रवास, ठाणे-वाशी आणि ठाणे-पनवेल मार्गावर 16 फेऱ्या, एसी लोकलचं सारथ्य महिलांकडे
- ऑक्सफर्ड डिक्शनरीत आता आधार, डब्बा, हरताल यांसह 26 भारतीय शब्दांचा समावेश, ऑक्सफर्ड डिक्शनरीची नवी आवृत्ती प्रकाशित
- अभिनेत्री सेजल शर्माच्या आत्महत्येनं बॉलिवूड हादरलं, आत्महत्येचं कारण अस्पष्ट, पोलिसांकडून अधिक तपास सुरु
- टीम इंडियाने पहिल्या ट्वेन्टी ट्वेन्टीत न्यूझीलंडचा सहा विकेट्सनी उडवला धुव्वा, श्रेयस अय्यरचं नाबाद अर्धशतक निर्णायक, राहुल आणि विराटची धडाकेबाज खेळी