बारामती, पुणे : राज्याचं लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात आज शेवटच्या सभा होत आहे. 7 जूनला बारामती लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडणार आहे. या आजच्या प्रचाराच्या सांगता सभा सुनेत्रा पवारांनी चांगलीच गाजवली. शरद पवारांनी (sharad pawar) त्यांचा बाहेरची सून म्हणून उल्लेख केला. त्यावर त्यांनी उत्तर दिलं आहे. शरद पवारांच्या आई शारदाबाई पवारही सून म्हणून पवार कुटुंबात आल्या. कुटुंबाचा कणा बनल्या आणि निवडणूक लढवून जिंकल्यादेखील आता त्याचीच पुनरावृत्ती करायचीय, असं म्हणत सुनेत्रा पवारांनी (Sunetra Pawar) शरद पवारांंच्या आईची कारकीर्द सभेत सांगितली. जिंकले किंवा हरले तरी माझं काम चालू ठेवेल, आपला विश्वास सार्थ करून दाखवेन, अशी साददेखील सुनेत्रा पवारांनी बारामतीकरांना घातली. 


ही निवडणूक वेगळी. मी अनेक वर्षे तिथे तुमच्या सारखी बसून उपस्थित होते. मला कधीही वाटलं नाही की या भूमिकेत येऊन मला बोलावं लागेल.प्रत्येकाने केलेला प्रचार ही माझ्यासाठी मोठी संपत्ती आहे. बारामतीत लोकांना बदल हवा आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात ज्यावेळी प्राचारासाठी फिरले त्यावेळी जिंकण्याच्या विश्वास वाढत गेला, विजय दूर नाही. दादांचा वादा आणि मोदींची गॅरंटी याचा प्रत्यय मला आला, असंही त्या म्हणाल्या. 


शरद पवारांच्या आई शारदाबाई पवार यादेखील पवारांच्या सून होत्या. त्यादेखील पवार कुटुंबात आल्यावर त्या कुटुंबाचा कणा बनव्या अख्ख पवार कुटुंब त्यांनी सांभाळलं. त्यानंतर त्या घराबाहेर पडल्या आणि निवडणूक लढल्या आणि त्या जिंकल्यादेखील हे सगळं त्या काळाच झालं. आता त्याच काळाची पुन्हा पुनरावृत्ती करायची आहे. मीदेखील पवारांनी सून आहे. मलादेखील साथ द्या, असं आवाहन त्यांनी केली. समाजकारणाचा वारसा आणि प्रेरणा मला माझ्या आजे सासूकडून म्हणजे स्व. शारदाताई पवार यांच्याकडून मिळाला. त्या लग्न करून पवार घराण्यात सून बनून आल्या व ज्या प्रकारे सामजिक कामे त्यांनी केले ते माझ्यासाठी प्रेरणादायी आहे, असंही त्या म्हणाल्या. 


'जिंकले, हरले तरी काम करणार'


बारामतीच्या जनतेला विकासासाठी बदल हवा आहे, आणि मला खात्री आहे बारामतीकर यावेळी नक्कीच बदल घडवून आणतील.मी जिंकले किवा हरले तरीदेखील काम करणार आहे, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली. 


इतर महत्वाची बातमी-


Shrinivas Pawar: घराण्यातील राजकीय संघर्षामुळे अजित पवारांची आई बहिणीकडे राहायला गेली, अजितदादांना 4 जूनला मिशा काढाव्या लागतील: श्रीनिवास पवार


Sharad Pawar : तेच शरद पवार, तेच बारामती, पण चिन्ह अन् मैदान मात्र वेगळं असणार; अजित पवारांनी हक्काचे मैदान घेतले!