Abhijit patil : आपली आमदारकी डावावर लागली तरी चालेल पण कारखाना वाचला पाहिजे ही भूमिका मी घेतली असल्याचे मत विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील (Abhijit patil) यांनी व्यक्त केलं. मला तिकडून उमेदवारी देखील जाहीर झाली होती. मी कोणत्याही पक्षाचा सदस्य नसतानाही मला लोकांनी निवडून दिलं. त्या कारखान्याच्या सभासदांशी माझी बांधिलकी असल्याचे अभिजीत पाटील म्हणाले. 


पुढच्या वेळेस साडेतीन हजार दर आम्ही देऊ 


आज तीन हजार दर दिला आहे. पुढच्या वेळेस साडेतीन हजार दर आम्ही देऊ असेही अभिजीत पाटील म्हणाले. आमच्या कारखान्याला मदत झाली पाहिजे ही आमची भूमिका होती. त्याप्रमाणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदत करण्याचे मान्य केलं आहे. तुम्ही आज आम्हाला मदत केली तर पुढच्या काळात कारखान्याला आम्ही सगळी मदत करु असे फडणवीस यांनी आश्वासन दिल्याचे अभिजीत पाटील म्हणाले. 


तुम्ही कुठेही जा पण कारखान्याचे कुलूप उघडलं पाहिजे


तुम्ही कुठेही जा पण कुलूप उघडलं पाहिजे असं अनेक सभासदांनी मला सांगितल्याचे अभिजीत पाटील म्हणाले.  आमच्या कारखान्याला मदत झाली पाहिजे ही आमची भूमिका होती. सगळी लोक सत्तेत गेली कारण, सत्तेत असल्याशिवाय कारखान्याला मदत होऊ शकत नाही असे अभिजीत पाटील म्हणाले. शेतकरी आणि सभासदांचे कोणतेही नुकसान झाले न पाहिजे असे पाटील म्हणाले. 


उजनीच्या पाण्याचे नियोजन करणं गरजेचं


उजनीच्या पाण्याचे नियोजन करणं गरजेचं आहे. ते जरा मागे पुढे झालं आहे. त्यामध्ये आपण लक्ष घालावं असेही अभिजीत पाटील देवेंद्र फडणवीस यांना म्हणाले. पंढरपूरला विमानतळ झालं पाहिजे, लाईटचा प्रश्न मिटला पाहिजे. पाण्याचा प्रश्न मिटला पाहिजे असे अभिजीत पाटील म्हणाले. साखरेच्या निर्यातीवर असणारी बंधने उठली पाहिजे. ती बंदी उठली आणि साखरेचे दर वाढले तर शेतकऱ्यांच्या ऊसाला 5000 रुपयांचा दर देणं शक्य होणार असल्याचे मत अभिजीत पाटील म्हणाले. दरम्यान, यावेळी अभिजीत पाटील यांनी माढा लोकसभेचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर आणि सोलापूर लोकसभेचे उमेदवार राम सातपुते यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. या दोन्ही उमेदवारांना निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे अभिजीत पाटील म्हणाले.


महत्वाच्या बातम्या:


Jayant Patil on Abhijeet Patil : विठ्ठल कारखाना सील करणे म्हणजे विठ्ठलालाच सील करण्याचे सरकारचे धाडस, अभिजीत पाटील भाजपात प्रवेश करतील : जयंत पाटील