(Source: Poll of Polls)
Baramati leopard Safari: मुख्यमंत्र्यांच्या ट्वीटमुळे संभ्रम; बारामतीतील बिबट सफारीचा प्रकल्प खरच रद्द होणार की दोन्ही तालुक्यात स्वतंत्र प्रकल्प होणार?
Baramati Leopard Safari : बारामतीतील बिबट सफारीचा प्रकल्प रद्द केल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी ट्वीटच्या माध्यमातून दिली. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुन्हा एकदा अजित पवारांना धक्का दिला आहे.
Baramati Leopard Safari : बारामतीतील बिबट सफारीचा (Leopard Safari) प्रकल्प रद्द केल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीटच्या माध्यमातून दिली. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) पुन्हा एकदा अजित पवारांना धक्का दिला आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्री असताना घेतलेला निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रद्द केला आहे.
महाविकास आघाडी सत्तेत असताना अजित पवार यांनी बिबट सफारी बारामतीला उभारण्याची घोषणा अर्थसंकल्पात केली होती. सुरुवातीला बिबट सफारी, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात टायगर सफारी बारामतीत करण्याचा मानस होता. यासाठी अजित पवार यांनी बारामती तालुक्यातील गाडिखेल याठिकाणी 100 हेक्टर जागा यासाठी राखीव ठेवली होती. तसंच जवळपास 60 कोटी रुपयांची तरतूद केली होती. याविरोधात जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी अधिवेशनामध्ये आवाज उठवला होता. त्यानंतर बारामतीमध्ये आणि जुन्नर या दोन्ही ठिकाणी हा प्रकल्प करण्यात येईल, असं अजित पवारांकडून स्पष्ट करण्यात आले होते. परंतु आता सत्ताबदल झाल्याने अजित पवार यांनी घेतलेला बिबट सफारी प्रकल्प बारामतीला उभारण्याचा निर्णय शिंदे सरकारकडून रद्द करण्यात आला आहे.
अजित पवारांच्या उपमुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात बिबट सफारी प्रकल्प बारामतीला होणार असल्याचे मात्र मुख्यमंत्री शिंदे यांनी आता या प्रकल्पाचा प्रस्ताव रद्द केला असून हा प्रकल्प जुन्नर तालुक्यातील आंबेगाव या ठिकाणीच होणार असल्याचे सांगितलं आहे. या निर्णयाबाबत मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवर माहिती दिली आहे. "बारामती तालुक्यातील कुरण गावात प्रस्तावित बिबट्या सफारी पार्क हे जुन्नर तालुक्यातील आंबेगव्हाण येथेच तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला," असं त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे.
बारामती तालुक्यातील कुरण गावात प्रस्तावित बिबट्या सफारी पार्क हे जुन्नर तालुक्यातील आंबेगव्हाण येथेच तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला.
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 15, 2022
मुख्यमंत्र्यांच्या ट्वीटमुळे संभ्रम
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील कुरण गावातील बिबट सफारी केंद्र हे जुन्नर तालुक्यातील आंबेगव्हाण या गावात होणार असल्याच ट्वीटरद्वारे जाहीर केलय. विरोधीपक्षनेते अजित पवार यांना हा धक्का मानला गेला. परंतू कुरण आणि आंबेगव्हाण ही दोन्ही गावे जुन्नर तालुक्यातच असुन दोन्ही गावांमधील अंतर हे 20 किलोमीटर आहे. या दोन गावांपैकी एका गावात बिबट सफारी केंद्र करण्याबाबत वन विभागाचा सर्वे सुरु होता. स्थानिक लोकप्रतिधींच्या आग्रहावरून आंबेगव्हाण गावाची निवड करण्यात आली. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बारामतीचा प्रकल्प जुन्नरला हलवल्याचे जाहीर केले. बारामती तालुक्यातील बिबट सफारी केंद्र हे गाडीखेल या गावात होणार असून जुन्नर आणि बारामती तालुक्यातील हे दोन स्वतंत्र प्रकल्प आहेत. बारामती वन विभागाच्या अधिकारी शुभांगी लोणकर यांनाही त्यांच्याकडे बारामतीतील बिबट सफारी केंद्र रद्द झाल्याची कोणतीही माहिती नसल्याच म्हटलं आहे.
टायगर सफारीचं काय?
बारामातीची बिबट सफारी जुन्नरला गेल्यानंतर बारामतीत टायगर सफारी होणार का? किंवा ती सफारीदेखील दुसरीकडे हलवण्यात येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या निर्णयावर मात्र राष्ट्रवादीकडून कोणतीच प्रतिक्रिया देण्यात आली नाही आहे. त्यांची प्रतिक्रिया आली की पुढचं चित्र स्पष्ट होणार आहे.
मौजे वढू-तुळापूर येथील स्वराज्य रक्षक छत्रपती #संभाजीमहाराज यांच्या बलिदानस्थळाचे नाव पूर्वीप्रमाणेच 'धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळ' करण्यास मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी अनुमती दिली. वढू-तुळापूर येथील ग्रामस्थांनी यासंदर्भातील मागण्यांचे निवेदन दिले होते. pic.twitter.com/DDE9ORoa59
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) September 15, 2022