Namo Rojgar Melava Live Updates : तरुणांना शिक्षण आणि कौशल्याप्रमाणे रोजगार मिळणार, रोजगार मेळाव्यात 55 हजार पदे सूचित

Baramati Namo Rojgar Melava Live Updates : आज बारामतीमध्ये नमो रोजगार मेळावा पार पडणार असून या कार्यक्रमाला अजित पवार आणि शरद पवार एकत्र दिसणार आहेत. या कार्यक्रमासंबंधित सर्व लेटेस्ट अपडेट्स वाचा...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 02 Mar 2024 12:24 PM
Baramati Rojgar Melava 2024 Live : बारामती नमो रोजगार मेळावा लाईव्ह पाहा

Namo Rojgar Melava 2024 Live : बारामतीमध्ये नमो रोजगार मेळाव्याला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह शरद पवार यांचीही या कार्यक्रमाला उपस्थिती पाहायला मिळत आहे.


बारामती नमो रोजगार मेळावा लाईव्ह येथे पाहा


Baramati News : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत होणारी उद्घाटने ऑनलाइन पध्दतीने

Baramati Namo Raojgar Melava : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत होणारी उद्घाटने ऑनलाइन पध्दतीने  होणार


नमो रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी बऱ्हाणपूर येथील पोलीस उपमुख्यालय, बारामती बस स्थानक आणि पोलीस वसाहतीचे होणार ऑनलाईन पध्दतीने उद्घाटन


बारामती विमान तळावर उतरल्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री येणार थेट विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर


बारामतीत नमो रोजगार मेळाव्याच्या उद्घाटनासाठी येणार मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री

Baramati Namo Rojgar Melava : पाच जिल्ह्यांतून युवक युवती या रोजगार मेळाव्यासाठी येणार

Baramati Namo Rojgar Melava : बारामतीत आज नमो रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. शरद पवार अध्यक्ष असलेल्या विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेच्या मंचावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शरद पवार तसेच खासदार सुप्रिया सुळे कार्यक्रमासाठी दाखल झाले आहेत. साधारणत: पाच जिल्ह्यांतून युवक युवती या रोजगार मेळाव्यासाठी येतील. 

Pune Police Vehicle News : पोलिसांच्या ताफ्यात नवीन 39 गाड्या दाखल

Ajit Pawar News : पोलिसांच्या ताफ्यात नवीन 39 गाड्या दाखल झाल्या आहेत. याचा शुभारंभ उपमुख्यमंत्रई अजित पवारांच्या हस्ते करण्यात आला. अजित पवारांनी गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला.

Ajit Pawar Live : उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पोलीस उपमुख्यालयाची पाहणी

Ajit Pawar in Baramati News : बारामती तालुक्यातील बऱ्हाणपूरच्या पोलीस उपमुख्यालयाची पाहणी करण्यासाठी अजित पवार पोहोचले.

Sharad Pawar News : स्टेजवर आसन व्यवस्था पूर्ण, देवेंद्र फडणवीसांच्या शेजारी शरद पवार बसणार

Baramati Rojgar Melava : नमो रोजगार मेळाव्याच्या स्टेजवर आसन व्यवस्था पूर्ण करण्यात आलीय आहे. देवेंद्र फडणवीसांच्या शेजारी शरद पवार यांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

Baramati Namo Rojgar Melava : मो रोजगार मेळाव्याच्या निमंत्रणावरून राजकारण

Baramati News : बारामतीत शनिवारी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नमो रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. मात्र चर्चा रंगलीय ती या मेळाव्याच्या आडून होणाऱ्या निमंत्रण आणि आमंत्रणाच्या राजकारणची. बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर होणाऱ्या या कार्यक्रमाच्या कार्यक्रम पत्रिकेत शरद पवारांच नावच नसल्याने शरद पवारांना या कार्यक्रमास का बोलाविण्यात आले नाही याची चर्चा सुरु झाली. दुसरीकडे शरद पवारांनी मात्र मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना चहापानाचेच नाही तर जेवणाचेही आमंत्रण देऊन टाकलं. त्यानंतर, नवीन निमंत्रण पत्रिका छापून त्यामधे शरद पवारांचे नाव छापण्याचा निर्णय घेण्यात आला. 

Baramati News : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री बारामती दौऱ्यावर

Baramati News : नमो रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार शनिवारी बारामतीत असणार आहेत.  आधी बारामतीतील पोलीस उपमुख्यालायचे उद्घाटन,  त्यानंतर नवीन बस स्थानकाचे उद्घाटन , त्यानंतर पोलीस वसाहतीचे उद्घाटन आणि त्यानंतर विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर नमो रोजगार मेळावा अशा भरगच्च कार्यक्रमांच आयोजन या निमित्ताने करण्यात आलंय. 

पार्श्वभूमी

Baramati Namo Rojgar Melava Live Updates : आज बारामतीमध्ये नमो रोजगार मेळावा पार पडणार असून या कार्यक्रमाला अजित पवार आणि शरद पवार एकत्र दिसणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या कार्यक्रमासंबंधित सर्व लेटेस्ट अपडेट्स वाचा...

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.