Baramati crime : महाविद्यालयातील विद्यार्थ्याला (crime) लुटून त्याला नग्न करुन त्याने (Baramati Crime) व्हिडीओ काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयील विद्यार्थ्यासोबत हा प्रकार घडला आहे. या विद्यार्थ्यांने अज्ञात व्यक्तीविरोधात पोलिसात  तक्रार दाखल केली आहे. बारामती तालुका पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांला अज्ञातांनी खिशातील 15 हजार रुपयांची रक्कम लुटली. तसेच त्या विद्यार्थ्यांला नग्न करून त्याचे नग्नावस्थेत चित्रीकरण केल्याचे देखील तक्रारीत म्हटलं आहे. 4 डिसेंबर रोजी रात्री 8 ते 8.30 च्या दरम्यान एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याला बारामती येथील सुभद्रा मॉलमधून खरेदी करून मेडिकल कॉलेजच्या होस्टेलकडे जात होता. त्यावेळी अज्ञात इसमानी विद्यार्थ्यांला वाटेत थांबवले आणि त्याच्या खिशातून बळजबरीने 15 हजार रक्कम काढून घेतली. 


त्यानंतर त्या विद्यार्थ्यांला गाडीवर बसून उसाच्या शेतात नेले आणि त्याला मारहाण केली. तसेच त्याला नग्न करून चित्रीकरण केल्याचं त्यानं तक्रारीत म्हटलं आहे. मारहाण केल्यानंतर विद्यार्थ्यांला एटीएममध्ये आणले आणि त्याच्या खात्यातील 15 हजार रक्कम अज्ञात इसमानी काढून घेतली आणि पोबारा केला. त्यावरून बारामती तालुका पोलीस ठाण्यात विद्यार्थ्यांन धाव घेतली आणि अज्ञात व्यक्तीवर गुन्हा नोंद केला आहे. 


नग्न करुन काढला व्हिडीओ
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या गुन्ह्यांमध्ये आणि छेडाछेडीच्या प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. तरुणांकडून असे गुन्हे सातत्याने घडत आहेत. या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांने तक्रारीत नमूद केलेल्या मुद्द्यांमुळे पोलिसही अवाक झाले आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांला लूटून त्यांच्याकडून पैसे उकळले आणि शिवाय त्याला उसाच्या शेतात नेऊन नग्न करुन त्याचे व्हिडीओदेखील काढल्याचं या विद्यार्थ्यांने तक्रारीत म्हटलं आहे. त्यामुळे आता मुलींबरोबर मुलंही असुरक्षित असल्याचं चित्र बघायला मिळत आहे. 


भुरट्या चोरांची दहशत
बारामाती शहरात भुरट्या चोरांची दहशत बघायला मिळत आहे. रात्रीबेरात्री तरुणांना किंवा ज्येष्ठ नागरिकांना लुटण्याचे अनेक प्रकार समोर येत आहे. त्यामुळे सर्वांच्याच सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गुन्हेगारीच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत आहे. अशा गुन्ह्यांमुळे शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. हे लहान गुन्हेच थांबवणं पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे. त्यामुळे सतर्क राहण्याचं आणि सुरक्षित राहण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. येत्या काळात अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रयत्नशील असणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.