नवी दिल्ली : बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना (PM Sheikh Hasina)   यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Modi) आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना (CM Mamata Banerjee) 2600 किलोचे आंबे भेट म्हणून पाठवले आहे. बांग्लादेशच्या मीडियाने ही बातमी दिली आहे. भारत कायमच बांगलादेशच्या मदतीसाठी कायम पुढे असतो.


मार्चमध्ये पंतप्रधान मोदी बांगलादेशच्या दौऱ्यावर गेले होते. कोरोना काळातील हा त्यांचा पहिला विदेश दौरा होता. आपल्या या दौऱ्यादरम्यान पीएम मोदींनी बांगलादेशच्या पंतप्रधानांना 109 अँम्ब्युलन्स आणि 12 लाख कोरोना वॅक्सीनचे डोस भेट दिले होते






बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान मोदींना घड्याळ आणि इतरही काही भेटवस्तू दिल्या आहेत. यामध्ये वंगबंधू शेख मुजिबुर रहमान यांच्या जन्म शताब्दीच्या निमित्ताने तयार करण्यात आलेल्या सोन्याच्या आणि चांदीच्या नाण्यांचा समावेश आहे. तसेच बांग्लादेशच्या स्वातंत्र्याला 50 वर्षे पूर्ण झाल्या निमित्ताने एक चांदीचे नाणे तयार करण्यात आलं होतं, तेही भारतीय पंतप्रधानांना देण्यात भेट म्हणून देण्यात आलं आहे. 


ममता बॅनर्जी यांना 'हिलसा मासा' भेट


बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना 2013 साली ज्यावेळी भारताच्या दौऱ्यावर आल्या होत्या त्यावेळी त्यांनी ममता बॅनर्जी यांना अनेक भेटवस्तू दिल्या होत्या, त्यामध्ये हिलसा माशाचा समावेश होता. एवढंच नाही तर त्याच वर्षी प्रणव मुखर्जी ज्यावेळी बांग्लादेशच्या दौऱ्यावर गेले होते त्यावेळी त्यांच्या जेवणामध्ये हिलसा माशाच्या विशेषकरुन समावेश करण्यात आला होता. 2016 साली ममता बॅनर्जीनी बंगालच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती त्यावेळीही त्यांनी शेख हसीना यांनी हिलसा मासा भेट म्हणून दिला होता.


संबंधित बातम्या :


PM Modi's Cabinet Expansion: केंद्रीय मंत्रिमंडळाचा 7 जुलैला विस्तार, महाराष्ट्रातून नारायण राणे आणि हिना गावित यांच्या नावाची चर्चा