पुणे : श्रावण संपल्यानंतर सण-वारांची मालिका सुरु होईल. गणशोत्सवानंतर दसरा आणि दिवाळी या सणांना बाजारात मोठी उलाढाल होत असते.


 

दिवाळीत खासकरुन फटाक्यांना मोठी मागणी असते. मात्र पुणे पोलिसांनी फटाक्यांबाबत नवी नियमावली जाहिर केली आहे. त्यामुळे दिवाळीत फटाके फोडताना आता नियमाचं पालन करणं पुणेकरांना बंधनकारक असेल.

 

नव्या नियमानुसार कानठाळ्या बसवणाऱ्या सुतळी बॉम्बवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. तसंच रस्त्यावर किंवा रस्त्यापासून 10 मीटर अंतरावर कोणत्याही प्रकारचे फटाके वाजवण्यास बंदी घालण्यात आली आहे.


 

काय आहेत नवे नियम?


*सुतळी बॉम्बवर पूर्णपणे बंदी.

*रस्त्यावर किंवा रस्त्यापासून 10 मीटर अंतरावर कोणत्याही प्रकारचे फटाके वाजवण्यास बंदी. शोभेचे फटाके, अग्नीबाण यांच्यावरही बंदी.

* फटाके विक्री करण्यासाठी 25 ऑक्टोबर ते तीन नोव्हेंबर हा कालावधी. त्यानंतर शिल्लक राहिलेले फटाके परवानाधारक घाऊक विक्रेत्याला परत करावे लागणार.