एक्स्प्लोर

बाळासाहेब सानपांच्या शिवसेना प्रवेशानंतर नाशिकमध्ये महापौर पदावरुन भाजप-सेना संघर्ष?

विधानसभा निवडणुकीत भाजपने तिकीट नाकारल्यानंतर बाळासाहेब सानप यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवून भाजपला आव्हान दिलं होतं. युतीचा उमेदवार असतानाही शिवसेना नेते संजय राऊत यांनी बाळसाहेब सानप यांची भेट घेऊन राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून दिली होती.

नाशिक : राज्यात मुख्यमंत्री पदावरून सत्तासंघर्ष सुरु असतानाच नाशिकमध्ये महापौर पदावरुन शिवसेना भाजपच्या मार्गात अडसर निर्माण करण्याची शक्यता आहे. भाजपचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांना शिवसेनेत प्रवेश देऊन शिवसेनेन आपले इरादे स्पष्ट केलेत.भाजपचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी 23 दिवसांच्या घरोब्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिट्ठी देवून शिवबंधन बांधल आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपने तिकीट नाकारल्यानंतर बाळासाहेब सानप यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवून भाजपला आव्हान दिलं होतं. युतीचा उमेदवार असतानाही शिवसेना नेते संजय राऊत यांनी बाळसाहेब सानप यांची भेट घेऊन राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून दिली होती. मात्र निवडणुकीत सानप यांना पराभवाचे धनी व्हावे लागले. नाशिक महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता येण्यात बाळासाहेब सानप यांचा मोलाचा वाटा होता. भाजपचे 66 नगरसेवक निवडून आले होते. या यशात सानप यांच्या मुलासह समर्थकांचाही समावेश होता. विधानसभा निवडणुकीत सानप यांच्या समर्थकांनी पक्षविरोधी काम केल्याने त्याचा अहवाल पक्षश्रेष्ठींना पाठविण्यात आला आहे. नाशिक महानगरपालिकेत भाजप आणि शिवसेनेच्या प्रत्येकी एका नगरसेवकाने राजीनामा दिल्यानंतर भाजपचे सध्या 65 तर शिवसेनेचे 34 नगरसेवक आहेत. कॉंग्रेस राष्ट्रवादीचे प्रत्येकी 6, मनसेचे 5, अपक्ष 3 आणि आरपीआय आठवले गटाचा 1 नगरसेवक असे मनपातील पक्षीय बलाबल आहे. सध्या शिवसेनेकडे विरोधीपक्षनेतेपद आहे. बाळासाहेब सानप यांचा शिवसेना प्रवेश झाल्यान त्यांच्या समर्थक नगरसेवकांच्या जोरावर महापौरपद मिळविण्याची रणनीती शिवसेनेकडून आखली जात आहे त्यासाठी विरोधी पक्षांची मोट बांधण्याचे प्रयत्न केले जात आहेत. एक महिनाच्या अंतराने नाशिक महापालिकेत महापौर उपमहापौर पदाची निवडणूक होणार असून आकडेमोड करण्यास आतापासूनच सुरुवात झाली आहे. महापालिकेवर भगवा फडकविण्याचे शिवसेनेचे स्वप्न आहे. राजकारणात काही होऊ शकते असा दावा शिवसेनेकडून केला जात असला तरी देखील कॉंग्रेस राष्ट्रवादी आणि मनसे शिवसेनेला पाठींबा देतील का? हे आगामी काळात पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत

ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा

काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल

काँग्रेसकडून सुनेत्रा पवारांचा गुंगी गुडिया असा उल्लेख, अमृता फडणवीस म्हणाल्या, काँग्रेसने माफी मागायला पाहिजे

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं

BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !

तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या

तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी

Embed widget