एक्स्प्लोर

बाळासाहेब ठाकरेंच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या नव्या जागेचा प्रस्ताव मंजूर

बाळासाहेब ठाकरे यांची येत्या 23 जानेवारीला जयंती आहे. या जयंतीचे औचित्य साधून हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पूर्णाकृती पुतळा मुंबईत उभारण्यात येणार आहे. पुतळ्याची जागा बदलल्याने नव्याने परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे पुतळयाचे बाळासाहेबांच्या जयंतीदिनी लोकार्पण होण्याची शक्यता नाही. मात्र बाळासाहेबांच्या जयंतीचे औचित्य साधून आज पुतळ्याच्या नव्या जागेचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. यानंतर आता पुढील परवानगी घेऊन पुतळा लवकरच उभारला जाईल, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा 17 नोव्हेंबर 2012 रोजी मृत्यू झाला. बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा गेटवे ऑफ इंडिया येथील महाराष्ट्र पोलीस मुख्यालयाच्या समोर उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीचे तत्कालीन अध्यक्ष यशोधर फणसे यांनी ऑक्टोबर 2015 रोजी गटनेत्यांच्या बैठकीत मांडला होता. त्याला तत्कालीन महापौर स्नेहल आंबेकर यांनी मंजुरी देऊन पालिका आयुक्तांच्या मंजुरीसाठी पाठवला होता. पालिका आयुक्तांच्या अभिप्रायानंतर हा प्रस्ताव महाराष्ट्र पुरातत्व कमिटी, मुंबई अर्बन आर्टस् कमिशन, तसेच राज्य सरकाराच्या गृह विभागाकडे मंजुरीसाठी पाठवला होता. याच दरम्यान पुतळा उभारण्यासाठी जागा अपूरी पडणार असल्याने स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय आणि नॅशनल गॅलरी ऑफ मॉर्डन आर्टस इमारतीसमोरील चौकात बसवावा, अशी सूचना केली. त्याप्रमाणे प्रस्ताव बनवण्यात आला. त्यावर चौकात आणि दुभाजकाच्या जागी पुतळा उभारता येत नाही. पुतळा उभारणीसाठी विशेष बाब म्हणून पालिका सभागृहाची परवानगी आवश्यक असल्याचा अहवाल प्रशासनाने दिला. त्याप्रमाणे आज पालिका सभागृहात विशेष बाब म्हणून बाळासाहेबांचा पुतळा उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. याबाबत बोलताना आज बाळासाहेब ठाकरे यांच्या नव्या पुतळ्याच्या जागेचा प्रस्ताव सभागृहात मंजूर झाला आहे. बाळासाहेब ठाकरे यांची येत्या 23 जानेवारीला जयंती आहे. या जयंतीचे औचित्य साधून हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. आजपासून खऱ्या अर्थाने पुतळा उभारण्यासाठी परवानगी मिळवण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. आता लवकरच राज्य शासन, कला संचालक महाराष्ट्र राज्य (सर जेजे स्कुल ऑफ आर्टस्) यांचे ना हरकत प्रमाणपत्र, प्रमुख वास्तूविशारद महाराष्ट्र शासन, पोलीस आयुक्त वाहतूक, कार्यकारी अभियंता वाहतूक व समन्वय यांचे ना हरकत प्रमाणपत्र, हेरिटेज कंझर्व्हेशन कमिटी यांची परवानगी घेतली जाईल. या विभागांची परवानगी मिळताच पुतळ्याचे अनावरण केले जाईल.

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Passes Away: नाना पाटेकरांचं निधन, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार भावूक; डोळे पाणावणाऱ्या प्रतिक्रिया, कोण काय म्हणालं?
नाना पाटेकरांचं निधन, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार भावूक; डोळे पाणावणाऱ्या प्रतिक्रिया, कोण काय म्हणालं?
Nana Patekar Passes Away: 'करारी अभिनेता आपण गमावला!' नाना पाटेकर यांच्या निधनाने राजकीय वर्तुळातूनही शोक; शरद पवारांसह दिग्गज नेते भावूक, कोण काय म्हणालं?
'करारी अभिनेता आपण गमावला!' नाना पाटेकर यांच्या निधनाने राजकीय वर्तुळातूनही शोक; शरद पवारांसह दिग्गज नेते भावूक, कोण काय म्हणालं?
Dharashiv News: दुधातून पाणी वेगळं... तेही पिण्यासाठी! दुष्काळी धाराशिवमध्ये खवा उद्योजकाचा भन्नाट 'राजहंस' प्रयोग; पाणी अन् विजेचीही मोठी बचत
दुधातून पाणी वेगळं... तेही पिण्यासाठी! दुष्काळी धाराशिवमध्ये खवा उद्योजकाचा भन्नाट 'राजहंस' प्रयोग; पाणी अन् विजेचीही मोठी बचत
Central Railway Mega Block: प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर 12 दिवसांचा मेगा ब्लॉक; लोकल कुठपर्यंत धावणार? एक्स्प्रेस किती उशिराने? जाणून सविस्तर घ्या
प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर 12 दिवसांचा मेगा ब्लॉक; लोकल कुठपर्यंत धावणार? एक्स्प्रेस किती उशिराने? जाणून सविस्तर घ्या

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patekar Passed Away: विश्वनाथ ते 'नाना'; मराठी सिनेसृष्टीतलं दिग्गज नाव, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं गोव्यात निधन, 75व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
विश्वनाथ ते 'नाना'; मराठी सिनेसृष्टीतलं दिग्गज नाव, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं गोव्यात निधन, 75व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
नाना पाटेकर : दुष्काळमुक्तीचा वसा, शेतकऱ्याचा कैवारी, नानाचं काम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही !
नाना पाटेकर : दुष्काळमुक्तीचा वसा, शेतकऱ्याचा कैवारी, नानाचं काम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही !
Nana Patekar Death Marathi News: नाना पाटेकर यांचं निधन, मृत्यूचं कारण आलं समोर; गोव्यातील घरी नेमकं काय घडलं?
नाना पाटेकर यांचं निधन, मृत्यूचं कारण आलं समोर; गोव्यातील घरी नेमकं काय घडलं?
Dhruv Rathee Abhijeet Dipke CJP Protest: ध्रुव राठी भारतात दाखल, जंतर-मंतरवर येण्याचं आवाहन; प्रकाश राज म्हणाले, ‘आली रे आली ग्यानू तुझी बारी आली’
ध्रुव राठी भारतात दाखल, जंतर-मंतरवर येण्याचं आवाहन; प्रकाश राज म्हणाले, ‘आली रे आली ग्यानू तुझी बारी आली’
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Embed widget