एक्स्प्लोर

छिंदमला जामीन मंजूर, कोणत्याही क्षणी जेलबाहेर येणार

छिंदमवर तोफखाना पोलीस ठाण्यात महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधान करुन सामाजिक तेढ निर्माण करणे, आणि सरकारी कामात अडथळा आणल्याचे दोन गुन्हे दाखल आहेत. दोन्ही गुन्ह्यात छिंदमला 15 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.

अहमदनगर : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या श्रीपाद छिंदमला अखेर जामीन मंजूर झाला आहे. 15 हजाराच्या जातमुचलक्यावर जिल्हा सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे जामीन दिल्यावर छिंदम केव्हाही कारागृहाच्या बाहेर येऊ शकतो. शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या छिंदमने जनक्षोभ उसळल्यावर व्हिडिओ प्रसारित करुन माफीनामा मागितला. मात्र आता छिंदमनं ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका घेतली आहे. छिंदमनं मी निर्दोष असून राजकीय अकसापोटी मला गुंतवण्यात आल्याचं अर्जात म्हटलं आहे. त्याचबरोबर, “मी घरातील एकमेव कर्ता पुरुष आहे. आई आजारी असून, दोन लहान मुले असल्यानं देखभालीसाठी जामीन मिळावा.” सरकारी वकिलांनी जामिनाला तीव्र आक्षेप घेतला. छिंदम बाहेर आल्यास तपासावर दबाव आणण्याची आणि पुरावा नष्ट करण्याची शक्यता वर्तवली. त्याचबरोबर छिंदमच्या  जीविताला धोका असून कायदा सुव्यवस्थेचा धोकाही वर्तवला आहे. मात्र न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकूण जामीन मंजूर केला आहे. छिंदम सध्या न्यायालयीन कोठडीत, असून नाशिक कारागृहात आहे. छिंदमची  कोठडी चौदा तारखेला संपत होती. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी न्यायालयात परवानगी मागून यापूर्वीच त्याला न्यायालयात हजर करण्याची विनंती केली होती. पोलिसांच्या विनंतीनुसार शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर केलं होतं. छिंदमवर वकिलांनी बहिष्कार टाकल्यानं त्यानं जामिनासाठी स्वतः अर्ज केला होता. छिंदमवर तोफखाना पोलीस ठाण्यात महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधान करुन सामाजिक तेढ निर्माण करणे, आणि सरकारी कामात अडथळा आणल्याचे दोन गुन्हे दाखल आहेत. दोन्ही गुन्ह्यात छिंदमला 15 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. तर सामाजिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी दर रविवारी दोन ते तीन यावेळीत हजर राहण्यास आणि पुरावा नष्ट न करण्याचा अटीवर जामीन मंजूर केला आहे. दरम्यान, शुक्रवारीच 19 तारखेपर्यंत छिंदमच्या  न्यायालयीन कोठडीत  वाढ केली. त्यामुळे छिंदमची रवानगी नाशिक कारागृहात करण्यात आली. दरम्यान छिंदमला जामीन मिळाला असल्याने त्याची केव्हाही सुटका होऊ शकते.

महत्त्वाच्या बातम्या

ऑक्टोबर हीट चा तडाका अधिक, नेमकी का होतेय तापमानात वाढ? राज्यात पावसाची शक्यता आहे का? हवामानाचा अंदाज काय?
ऑक्टोबर हीट चा तडाका अधिक, नेमकी का होतेय तापमानात वाढ? राज्यात पावसाची शक्यता आहे का? हवामानाचा अंदाज काय?
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
ऊसाला 5 हजार 500 रुपयांचा दर मिळावा, अन्यथा ऊस तोडू देणार नाही, राजू शेट्टींचा एल्गार, नेमक्या काय आहेत मागण्या?
ऊसाला 5 हजार 500 रुपयांचा दर मिळावा, अन्यथा ऊस तोडू देणार नाही, राजू शेट्टींचा एल्गार, नेमक्या काय आहेत मागण्या?
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका

व्हिडीओ

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं

आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
Embed widget