Maharashtra Politics मुंबई :  भाजपच्या नेत्या नवनीत राणा (Navneet Rana) यांनी नुकतेच आमदार बच्चू कडूंवर (Bacchu Kadu) सडकून टीका करताना त्यांचा उल्लेख तोडी बहाद्दर, ब्लॅकमेलर, सुपारीबाज, ढोंगी, गारुडी असा केला. काही सुपारी वाल्यांनी मला पाडायला सुपारी घेतली, अशा बेईमांना मी आता हाकलल्या शिवाय स्वस्त बसणार नाही, असा सज्जड दमही त्यांनी दिला. अशातच आता नवनीत राणांच्या (Navneet Rana) या टीकेला बच्चू कडू यांच्या कडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे.


माझ्या बोलण्याची आग लागली असेल म्हणून तर धूर निघतोय. विधानसभेला देखील असाच मोठ्या प्रमाणात धूर निघेल. असे म्हणत बच्चू कडूंनी परत एकदा नवनीत राणांवर निशाणा साधला आहे. आगामी विधानसभा निवडणुकींकरिता राज्यात नवी आघाडी स्थापन करण्याबाबत स्वराज्य पक्ष प्रमुख छत्रपती संभाजीराजे, प्रहार पक्ष प्रमुख आमदार बच्चू कडू व विविध पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आज मुंबई येथे बैठक होत आहे. त्यावेळी बोलताना बच्चू कडूंनी हे वक्तव्य केलंय.


सर्वांनी बोलण्यापेक्षा 5 उठाबशा काढाव्यात


महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर असलेला पुतळा कोसळल्याची दुर्घटना घडल्यानंतर याचे पडसाद संपूर्ण राज्यभरात पाहायला मिळत आहेत. राज्यात या प्रकरणावरुन संतापाची लाट उसळली आहे. अशातच याच घटनेचा निषेध म्हणून बच्चू कडू यांनी सरकारला जबाबदार ठरवले आहे. छत्रपतींनी राज्यात विचार मजबूत केलाय. मात्र राज्यातली वैचारिक बैठक आता संपली आहे.


मुख्यमंत्री म्हणतात समुद्रातील वाऱ्यामुळे स्मारक कोसळले, मात्र समुद्रात वारेच वाहतात. तिथली भौगोलिक परिस्थिती पाहूनच पुतळा बांधला पाहिजे होता. किंबहुना काम करणाऱ्या त्या ठेकेदाराला तेवढी अक्कल पाहिजे होती. प्रत्येक गोष्टीला राजकारणात आणायला नको. संधी साधून राजकारण करण्यापेक्षा आणि सरकार पेक्षा शिवाजी महाराज आम्हाला महत्त्वाचे आहे. त्यामुळे सर्वांनी बोलण्यापेक्षा 5 उठाबशा काढाव्यात, असा सल्लाही बच्चू कडू यांनी दिलाया.


काय म्हणाल्या होत्या नवनीत राणा?


हैदराबादवरून टी राजा या माझ्या भावाने मला जिंकायला साथ दिली आणि काही भाऊ इथे राहून मला पाडायची सुपारी घेत फिरत होते. मात्र, धोक्याला माफी नाही, पूर्ण हिशोब होणार. जे भगव्यासाठी लढणार त्यांच्यासाठी मी शेवटपर्यंत त्यांना साथ देणार. आता मी बेईमांना हाकलल्या शिवाय स्वस्त बसणार नाही. अशी टीका नवनीत राणांनी आमदार बच्चू कडूंवर केली होती. बच्चू कडूंवर सडकून टीका करताना नवनीत राणांनी बच्चू कडूंचा उल्लेख तोडी बहाद्दर, ब्लॅकमेलर, सुपारीबाज, ढोंगी, गारुडी असा केला. काही सुपारी वाल्यांनी मला पाडायला सुपारी घेतली, अशा बेईमांना मी आता हाकलल्या शिवाय स्वस्त बसणार नाही, असा सज्जड दमही त्यांनी दिला. 


आणखी वाचा


त्यांना वाटत असेल, पण आम्ही कोंबड्या वगैरे आणल्या नाहीत, राजकोट किल्ल्यावर राडा सुरु असताना आदित्य ठाकरेंचा बोचरा वार