औरंगाबाद : शेतकऱ्यांच्या उसाचा एफआरपी थकवल्यामुळे भाजप नेते बबनराव पाचपुते यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने झटका दिला आहे. पाचपुते यांच्या हिरडगावातील साईकृपा साखर कारखान्याची जप्ती होणार आहे.


 

शेतकऱ्यांना 38 कोटी रुपयांचा थकीत एफआरपी मिळावा यासाठी परांडा, जामखेड, करमाळा आणि फलटण येथील 96 शेतकऱ्यांच्या वतीने स्वाभिमानी संघटनेने हायकोर्टात धाव घेतली होती.

 

2014-15 मधील शेतकऱ्यांचे 38 कोटी 25 लाख रुपयांचा एफआरपी थकवल्याप्रकरणी साईकृपा साखर कारखान्याला जप्तीची नोटीस बजावली होती. त्यानंतर शेतकऱ्यांना थकीत रक्कम देण्याचं आश्वासन कारखान्यातर्फे देण्यात आलं होतं. मात्र ते न पाळल्याने आता साईकृपा कारखान्याच्या जप्तीचा मार्ग मोकळा झाला आहे.