'रजनीकांत महाराष्ट्राचा, त्याला 'महाराष्ट्र भूषण' द्या'
एबीपी माझा वेब टीम | 26 Jul 2016 07:29 AM (IST)
मुंबई : सुपरस्टार रजनीकांत हे मूळचे महाराष्ट्राचे आहेत. त्यामुळे या अभिनेत्याचा 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार देऊन गौरव करा, अशी मागणी भाजपचे धुळ्याचे आमदार अनिल गोटे यांनी विधानसभेत केली. आमदार अनिल गोटे यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करत, ही मागणी केली.
'कबाली'चा धुमाकूळ रजनीकांतचा कबाली हा सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. या सिनेमाने कमाईमध्ये बॉक्स ऑफिसवरील सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. ‘कबाली’ सिनेमाने पहिल्याच दिवशी तब्बल 250 कोटींची कमाई केली होती. संबंधित बातम्या